नितीनजी गडकरी यांनी राहुल कर्डिले व मोहम्मद समीर मोहम्मद याकूब यांच्या तर्फे जाणून घेतल्या वाहन चालकांच्या समस्या….
वर्धा / भारत देशाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांचा ड्रायफोर्ट ग्राउंड सिंदी रेल्वे जिल्हा वर्धा येथे यांचा भेट दौरा संपन्न झाला यावेळी वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर मोहम्मद याकुब वर्धा व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या संयुक्त विद्यामाने नाविन्यपूर्ण योजना आखल्या जात आहेत सन २०२३-२०२४ अंतर्गत स्ट्रॉयसेफ Straysafe योजनेच्या प्रदर्शनीस उपस्थित मान्यवरांनी भेट दिली.वर्धा जिल्हयात राबविण्यात आलेल्या मोकाट जनावरांना परावर्तित पट्टे लावण्याचा उपक्रम इतर राज्यात राबविण्यात आल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होऊ शकेल असे मत केंद्रीय परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.जिल्हयातील सर्व तालुक्यातील गावोगावी जनावरांना लावण्यात येणाऱ्या स्ट्रॉयसेफ Straysafe परावर्तीत पट्टयाची माहिती संकलीत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲन्डा्ईड ॲप Mobile Android App ची वैशिष्टये जाणून घेतली.सदर ॲप मध्ये जनावरांना लावण्यात आलेल्या परावर्तीत पट्टयासह फोटो, दिनांक, पट्टा क्रमांक, ठिकाण इत्यादी माहिती संकलीत करण्यात येत असल्याने सदर नाविन्यपूर्ण उपक्रमाची प्रशंसा केली.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वर्धा जिल्हाचे खा.रामदास तडस,लोकसभा वर्धा मतदार संघ, हिंगणघाट येथील आ.समीर कुणावार,विधानसभा हिंगणघाट आ. दादाराव केचे विधानसभा आर्वी मतदार संघ,आ. पंकज भोयर,विभानसभा,वर्धा मतदार संघ, माजी खा.सुरेश वाघमारे तसेच NHAI व NHLML चे पदाधिकारी साठीनाथन ,प्रकाश गौरे,आशिष आस्थी,वाटारे,संजय पाटिल यांची उपस्थिती लाभली.