निराधारांच्या मानधनात केवायसीचा अडथळा..! लाभार्थ्यांच्या बँकेच्या शाखेत येरझारा….

0

 सेलू -/ निराधारांना मिळणाऱ्या लाभात ऐनवेळी केवायसीचा खोडा घातल्याने लाभार्थ्यांना मानधनासाठी बँकांचा उंबरठा झिजवावा लागतोयं. शासनाने लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे तर जमा केलेत, परंतु बँकाच्या ढिसाळ कारभारामुळे ते पैसे पदरात पाडून घेण्यासाठी लाभार्थी बँकाच्या शाखांत येरझारा मारत असल्याचे चित्र आहे.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांसारख्या निराधारांसाठी असलेल्या योजनांचे पैसे जमा झाले अथवा नाही, याकरिता सहसा निराधार योजनेचे लाभार्थी बँकाच्या शाखांत आपल्या पासबुकात नोंद करण्यासाठी जातात. त्यांना येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील कर्मचारी केवायसी करण्याचा सल्ला देतात. येथील बँकेच्या शाखेत केवायसीला जवळपास एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो. याठिकाणी दोन ते तीन महिने केवायसी न झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यासंदर्भात एखाद्या लाभार्थ्यांने विचारणा केल्यास त्याला याठिकाणी बोंबाबोंब करण्यापेक्षा मुख्य शाखेत जाण्याचा उद्धटपणाचा सल्ला दिला जातो. लाभार्थ्यांना केवायसीसाठी मुख्य शाखेत जाणं म्हणजे “असून अडचण नसून खोळंबा” असा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.शासनाने निराधारांच्या खात्यात नुकतेच दोन महिन्यांचे मानधन थेट जमा केले. परंतु त्यांना ते पदरात पाडून घेण्यासाठी केवायसीने खोडा घातला आहे. निराधार लाभार्थ्यांना या केवायसीच्या चक्करमध्ये दररोज बँकाच्या शाखांत येरझारा माराव्या लागतात. सरकार तर मानधन देतयं परंतु बँकाच्या ढिसाळ कारभारामुळे ते लाभार्थ्यांच्या पदरातचं पडत नसल्याची ओरड सध्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांत आहे.

सचिन धानकुटे साहसिक news -/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!