वर्धा -/तळेगाव येथील दामिनी पथकाद्वारे नूतन कन्या विद्यालय तळेगाव (श्या. पंत) येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा , सायबर क्राईम आणि रस्ते सुरक्षा या विषयी माहिती देण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.तसेच त्यांना विचारण्यात आलेला प्रश्नांची उत्तरे योग्यरीत्या देण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला.तसेच या कार्यक्रमाप्रसंगी ASI सुनिता ठाकरे,पोलीस कॉन्स्टेबल दिनेश धवणे आणि म. पो.नि. अंजली गाडेकर हे उपस्थित होते.विद्यार्थ्यांना सायबर क्राईम बद्दलची माहिती सांगताना ASI सुनिता ठाकरे यांनी वेगवेगळ्या उदाहरणांचा,दाखलांचा उपयोग घेऊन विद्यार्थ्यांना सायबर क्राईम पासून कसे दूर राहावे आणि सोशल मीडिया वरती ऍक्टिव्ह असताना कोणती काळजी घ्यावी; याबद्दलचे धडे दिले.तसेच कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेतील मुख्याध्यापिका शारदा वसंत पाटील तसेच दलाल सर,बनसोड मॅडम, अजमेरे मॅडम,गाडगे मॅडम,बोबडे मॅडम, धुळे मॅडम उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन कु.सोनम मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन भांडेकर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मदत केली.