नॅक मूल्यांकनात देवळीच्या ज्ञानभारती महाविद्यालयाला ‘बी ‘श्रेणी प्राप्त…

0

देवळी / राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद या स्वायत्त्यसंस्थेतर्फे ज्ञान भारती महाविद्यालय देवळी येथे  14 व 15 मार्च 2024 रोजी मूल्यांकन करण्यात आले. नॅक नामांकन समितीचे चेअरपर्सन डॉ. रक्षपाल सिंग (फार्मर व्हाईस चान्सलर स्वामी केशवानंद राजस्थान एग्रीकल्चर यूनिवर्सिटी बिकानेर) कोऑर्डिनेटर मेंबर डॉ. आर्मस्ट्रॉंग सुसाईमनीकमं (प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट इंग्लिश युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास) मेंबर पर्सन डॉ.टी. एम. जोसेफ (फार्मर प्रिन्सिपल निर्मला कॉलेज. केरळ) या समितीने पहिल्याच सायकलमध्ये उत्कृष्ट पद्धतीने मूल्यांकन करून ज्ञानभारती कॉलेजला ‘बी’ श्रेणी दिली. ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्तापूर्ण शिक्षण सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असावे, हे संस्थेचे सचिव डॉ.प्रीतम खडसे यांचे ध्येय आहे. ज्ञानभारती विद्यालय 2010 पासून सुरू झाले असून आज पर्यंत अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. ‘बी’ श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ. प्रीतम खडसे सर यांनी प्राचार्य डॉ. के. डी. पाटील सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी , पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सागर झोरे साहसिक न्यूज / 24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!