🔥नेत्रहीन,दिव्यांग बांधवांना आत्मसन्मानाचा मार्ग दाखविणे गरजेचे,मोहन अग्रवाल.
वर्धा -/ आयुष्यात येणार चढ-उतार ही एक दैवी योजना असल्याचे जरी आपण गृहीत धरले तरी काही व्यक्तींना त्यांच आयुष्य दृष्टीहीन आणि पुर्णत्व अंधकारमय जगण्याचे नशीबी येते तेव्हा या विश्व निर्माता विधात्याने केलेले दुजाभाव साऱ्यानांच क्लेशदायक ठरतो. मात्र समोर ठाकलेल्या विपरीत परिस्थितीला समोरे जाण्याचे धैर्य आणि आत्मविश्वास अश्या पिडीतांच्या मनात निमार्ण करणाचे काम आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाने करणे ही एक परोपकारीय अभिव्यक्ती ठरते. नेत्रहीन, दिव्यांग बांधवांना आत्मसन्मानाचा मार्ग दाखविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबु अग्रवाल यांनी व्यक्त केले.
ते १२ जानेवरी रोजी संत गजानन महाराज देवस्थानच्या सभागृहात ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम व स्व. गायत्री देवी अग्रवाल सेवा संस्था व्दारा आयोजित स्नेह मिलन तथा नेत्रहीन, दिव्यांग बांधवांना जिवनोपयोगी साहित्य वितरण सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष डॉ. अनिलकुमार दक्ष यांनी केले, तर प्रमुख अथिती म्हणून फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, राष्ट्रीय सचिव किरण फुलझेले, प्रबोधनकार मयूर महाराज दरणे, उप-कार्यकारी अभियंता अमोल आठवले, सत्यआश्रम मंडळाचे अध्यक्ष विजय सत्यम, समाजसेवी चेतनबाबू अग्रवाल, नाना पहाडे, मधू अग्रवाल, फोरमचे प्रदेश कार्यकारणी सदस्य उल्हास वाघ, राजु लभाणे, जिल्हाधक्ष संतोष तूरक, डॉ. हेलन केअर अंध व अपंग संस्थेचे सचिव प्रकाश सिंग बावरी, दिव्यांग वेलफेअर फांऊडेशनचे उपाध्यक्ष भिमराव वाघ, समाजसेवी शरद कठाणे, संजय मिश्रा, अब्दुल गणी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
प्रस्तावना करताना इमरान राही म्हणाले की, दिव्यांग व नेत्रहीन बांधवांची मदत करणासाठी आपण सहानुभूती आदर आणि योग्य कृतीचा अवलंब केला पाहिजे, त्यांना स्वावलंबी बनण्यास प्रोत्साहन देणे तसेच त्यांना आवश्यक जीवनयोपगी वस्तू उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. जेणेकरून ते समाजाचा सन्मानीय भाग बनू शकतील.
या घटकांना मदतीची गरज आहे पण ती सहानुभूती पेक्षा आदराने आणि सम्माने देणे आपली नैतिक जबाबदारी आहे असे मत मयूर महाराज दरणे यांनी व्यक्त केली. डॉ. अनिल दक्ष, प्रकाशसिंग बावरी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन फोरमचे प्रदेश संघटक हरीष तांदळे यांनी केले आभार महेश अग्रवाल यांनी मानले. या प्रसंगी १०० नेत्रहीन व दिव्यांग बांधवाना भोजनदान व ब्लॅकिट वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करयाकरिता, वेदांत चौधरी, दिनेश अग्रवाल, विक्रांत गव्हाने, अँड इब्राहीम बख्श, एहसान राही, साहिल वाघ, सुनिल पाटिल, दिपक अग्रवाल आदीनी अथक परिश्रम घेतले.