नेहरू विद्यालय सालोड येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न….

0

🔥नेहरू विद्यालय सालोड येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.

वर्धा -/ ग्राम सुधार शिक्षण मंडळ सालोड(हि.) द्वारा संचालित नेहरू विद्यालय सालोड(हि.) येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की मराठी दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या मातृभाषेचा आदर करण्याचा, तिचा वापर वाढवण्याचा आणि पुढील पिढीसाठी ती जपण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. मराठी ही समृद्ध साहित्यिक परंपरा असलेली भाषा असून संत साहित्य, लोकसाहित्य, आधुनिक काव्य-कथा-कादंबरी यांचा तिला मोठा वारसा आहे. २७ फेब्रुवारी हा वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन आहे. ते मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी, लेखक व विचारवंत होते. त्यांच्या सन्मानार्थ आणि मराठी भाषेच्या गौरवासाठी हा दिवस मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थिनींनी मराठी गीतावर नृत्याचे सादरीकरण केले. तसेच कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम च्या वतीने ‘मी व माझे आजी आजोबा’ या विषयावर निबंध स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत कु. माही रवींद्र वाघमारे (इयत्ता आठवी) हिने प्रथम क्रमांक व कु.देवयानी दुर्गाप्रसाद भिमटे (इयत्ता नववी) हिने द्वितीय क्रमांक तसेच चित्रकला स्पर्धेत कु.सानिया जावेदखा पठाण (इयत्ता सातवी) हिने प्रथम क्रमांक व कु. राधिका हरिदास नैताम (इयत्ता सातवी) हिने द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन कस्तुरबा रुग्णालय सेवाग्रामच्या वतीने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कल्पना दखणे यांनी केले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!