नोंदणी अर्जावर स्वाक्षरी घेण्याकरिता गवंडी कामगारांची गर्दी…

0

मोठ्या प्रमाणात केली महिला व पुरुषांनी नगरपरिषद कार्यालयावर गर्दी.

देवळी / तालुक्यातील ईसापुर येथे शासनाच्या योजनेअंतर्गत गवंडी कामगारांना ईसापुर या गावाजवळील वाटप केंद्रावर किचन सेट चे वाटप सुरू आहे हा लाभ घेण्याकरिता गवंडी कामगार मोठ्या प्रमाणामध्ये अर्जाचे नूतनीकरण व नवीन नोंदणी करिता अर्ज भरण्याचे काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे.नूतनीकरण व नवीन अर्जावर नगरपरिषद कार्यालयातून बांधकाम अभियंता व मुख्य अधिकारी यांची अर्जावर स्वाक्षरी आवश्यक असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये महिला व पुरुष कामगार स्वाक्षरी घेण्याकरिता दररोज नगरपरिषद कार्यालयात उंबरठे झिजवत आहे.गवंडी कामगार नूतनीकरण व अर्ज नगरपरिषद कार्यालय मध्ये दिल्यावर बांधकाम अभियंता व मुख्य अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या होईपर्यंत हा अर्ज कामगार कार्यालयाकडे पाठवता येत नाही पण सध्या नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी यांची दुसऱ्या नगरपालिकेमध्ये बदली झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याकरिता अर्ज पडून असल्याचे सांगण्यात येत आहे अभियंता तसेच बांधकाम अभियंता सुद्धा सेवानिवृत्त दुसऱ्या नगरपरिषद सेवानिवृत्त झाल्याने दुसऱ्या नगरपालिकेच्या बांधकाम अभियंता ला येथे येऊन अर्जावर स्वाक्षऱ्या करण्याची जबाबदारी दिली आहे तो सुद्धा आठवड्यातून एकच दिवस येत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज नगरपरिषद मध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज संग्रहित झाले आहे.ताबडतोब मुख्य अधिकारी व बांधकाम अभियंता यांची देवळी नगरपरिषद वर नियुक्ती करण्याची मागणी करण्यात केली आहे.तालुक्यात लोकसंख्येच्या तुलनेत गावोगावी 70 ते 75 टक्के नोंदणी अर्ज भरण्यात आले असून नोंदणी नुसार प्रत्येक गावात 75 टक्के गवंडी कामगार असल्याचे कागदपत्रावरून दिसून येते या गवंडी कामगारांमध्ये सदन व श्रीमंतांचा समावेशअसल्याचे दिसून येते. ज्यांनी आयुष्यामध्ये कधीही गवंडी मजुरांचे टोपले पावडे व काम कधीही केलेले नाही अशा महिला व पुरुषांचा गवंडी कामगार म्हणून नोंदीमध्ये समावेश होणे हे बोगस गवंडी कामगार सवलती लाटण्यापुरतेच मर्यादित असून खरा गवंडी कामगार या सवलती पासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी झाल्यास सत्यता सामोर येईल आणि खऱ्या गवंडी कामगारांना योजनेचा लाभ मिळेल.

सागर झोरे साहसिक न्यूज /24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!