पंचवीस कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करणारे तत्कालीन जिल्हा सहकारी कामगार अधिकारी राजदीप धुर्वे मासूम मडावी व कामगार संघटनेचा तोतया अध्यक्ष यशवंत यावर भामट्या झाडे ला अटक केव्हा होणार

0

प्रतिनिधी/वर्धा

जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील तत्कालीन कामगार अधिकारी मा. सु. मडावी व राजदीप धुर्वे या दोन अधिकाऱ्यांनी कामगार संघटनेचा दलाल व नगर सेवक यशवंता उर्फ भामट्या नांमदेव झाडे याला हाताशी धरून 6 हजार बनावट पावती पुस्तके छापून चक्क 14 कोटी 23 लाख रुपयाचा आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखा वर्धा यांना दिली. परंतु या गुन्ह्यातील आरोपीतांनी चौकशी अधिकारी ए. पी.आई सचिन यादव यांनाच लाखो रुपयाची लाच देवून मॅनेज केल्याची चर्चा कामगार नेता यशवंता उर्फ नामदेव झाडें यांनी केली आहे. सदर घटना सत्य असावी याला आता पुष्टी मिळत आहे. करणं या सर्व आरोपीत्यांना दिवाळी पूर्वीच अटक करण्याची हमी ए. पी. आई. सचिन यादव यांनी दैनिक सहासिकला दिली होती आम्ही सुद्धा विश्वास ठेऊन आरोपीला अटक होणार व शासनाच्या 23 कोटी रुपयाची वसुली करून भ्रष्ट अधिकाऱ्याला जरब बसेल, अशी आमची मनोमन खात्री पटली होती. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालून त्याचा या घोटाळ्यात सबंध नाही, अश्या लोकांना अटक करून मोठा घोटाळा करणाऱ्या आरोपीला आज रोजी अटक नाही व भविष्यात सुद्धा अटक करण्याची हिम्मत आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांत नाही, हे स्पष्ट होते. 14 कोटी 23 लाख रुपयाचा आर्थिक घोटाळा तत्कालीन कामगार अधिकारी मा. सु. मडावी यांनी केला आहे. त्यांनी 6 हजार अर्जावर सही व मंजुरी आदेश व अर्ज तपासणी न करताच लाभार्थीना कमिशन घेऊन वाटप करण्यात आले. तसेच अवजारे वाटप कार्यक्रम शासनाने बंद केल्यानंतर सुद्धा मा. सु. मडावी याने 19 लाख रुपयाचे साहित्य वाटप केले. तसेच तत्कालीन कामगार अधिकारी राजदीप धुर्वे याने कोट्यावधी रुपयाची संपत्ती जमा केली आहे.
जिल्हा कामगार अधिकारी या पदावर असतांना 4 वर्ष्यात राजदीप धुर्वे बल्ले बल्ले झाला आहे. त्याने आपले आई,बंधू,सासरे यांच्या नावावर कोट्यावढी रुपयाची सम्पत्ती लाचेच्या पैश्यातून खरेदी केली आहे. या बाबतचे सर्व पुरावे आर्थिक गुन्हे शाखा वर्धा यांना दिले आहे. तसेच राजदीप धुर्वे याने पोद्दार बगीच्या येथील नगर सेवक यशवंता उर्फ भामट्या नामदेव झाडें याला हाताशी धरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता 6 हजार बनावट पावती पुस्तके बनून 14 कोटी रुपयाचा आर्थिक घोटाळा केल्याचा पुरावा देवून सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेचे पी. एस. आई. सचिन यादव प्रकरण चौकशीत दाखून या भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवीत तर नाही ना? असा प्रश्न सध्या कामगार संघटनेत चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!