🔥पंचायत समितीच्या प्रवेश द्वारावर होते वाहणाची पार्किंग,अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची शोधा शोध.
आष्टी शहीद -/ आष्टी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी नागेश ढोरे यांची तडका फडकी बदली झाल्यावर त्यांच्या रिक्त जागेवर अनिल रामटेके नावाचे अधिकारी गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाले. रुजू होताच गटविकास अधिकारी हे केव्हा येतात आणि केव्हा जातात याची कार्यलययत माहिती नसल्याचे समोर आले.
सविस्तर असे कि,
आष्टी तालुक्यातील परसोडा येथील युवा कार्यकर्ता पंकज चतुर यांनी गावातील तक्रारी बाबत चौकशी करण्यासाठी पंचायत समिती कार्यलय गाठले तेव्हा गट विकास अधिकारी अनिल रामटेके हे त्यांच्या कार्यालयात उपस्थित नव्हते. तब्बल चार तास उशिरा आल्यावर त्यांना काही नागरिक भेटीसाठी गेले तेव्हा त्यांनी वी. सी. मिटिंग चालू म्हणून बोलण्यात नकार दिला. तशीच पंचायत समिती इमारतीमध्ये असलेल्या शौचालय ची दुर्गंध संपूर्ण कार्यालयात पसरल्याने तेथे कार्यरत असलेले कर्मचारी व येणारे जाणारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसते. सकाळ पासून आलेले परसोडा गावातील सामाजिक कार्यकर्ता पंकज चतुर यांनी चार तास प्रतीक्षा केल्यावर सुद्धा अधिकारी यांनी समस्या ऐकून घेतली नाही. चतुर यांनी फोन वर बोलणी केली तेव्हा उशिरा येण्याचे कारण काय आणि पंचायत समितीच्या प्रवेश द्वारावर दुचाकी वाहणाची पार्किंग कशी यावर बोलणी केली तेव्हा त्यांनी फोन बंद केला. पंकज चतुर यांच्या म्हणायनुसार सत्य पडताळणी साठी कार्यालयात गेलो तेव्हा पंचायत समिती च्या गेट समोर वाहणाची पार्किंग लावण्यात आली होती. बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना मात्र गेटसमोर असलेल्या पार्किंग चा नाहक त्रास सहन करावा लागला.बाहेर गावातून आलेल्या नागरिकांना तहान लागली होती त्यांनी पाणी भरलेल्या कॅन जवळ गेले तर त्या कॅन मध्ये पाणी नव्हते. तहानलेल्या नागरिकांना कार्यालयात गेल्यावर पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसेल तर काय? ऐकूनच गट विकास अधिकारी यांना कामाचा अनुभव आहे कि नाही यात शंका आहे.पंकज चतुर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.