परम पूजनीय माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था मध्ये संविधान दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मुक्ताईनगर – पंकज तायडे
मुक्ताईनगर कुऱ्हा- वडोदा जिल्हा परिषद गटातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्व, अशोक फडके माध्य मिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुऱ्हा (काकोडा) येथे माजी सभापती तथा सदस्या विद्या पाटील, पं.स. सदस्य राजेंद्र सावळे, यांच्या वतीने इ १० वी व, १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दि २६ / ११/ २०२१ रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद शिवलकर होते. प्रथम संविधान दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधानाचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी कुऱ्हा -वडोदा जिल्हा परिषद गटातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्या विनोद पाटील यांच्या वतीने पुष्पगुच्छ मानपत्र व शब्दकोश पुस्तिका भेट देऊन सन्मानित करण्यात आले तर , पं. स.सदस्य राजेंद्र सावळे यांनी संविधान दिनानिमित्त स्वर्गीय अशोक फडके विद्यालयास भारतीय संविधान भेट आणि गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय संविधान भेट देऊन सन्मानित केले यावेळी बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांची प्रमुख उपस्थिती होती, त्यांनी आपल्या भाषणातून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले, सूत्रसंचालन प्रा.एच. ए.कर्हे, यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. योगेश नेटके. यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी प.पु.मा.स. गोळवलकर गुरूजी सार्व संस्थेचे कोषाध्यक्ष पुरणमल चौधरी, संस्थेचे सचिव भालचंद्र कुलकर्णी , संचालक राजकुमार.टावरी,पी.टी. बढे , प्रभाकर सुशिर, संस्थेच्या संचालिका गौरी फडके, प्राचार्य व्ही.एस. चौधरी सर्व शिक्षक शिक्षिका वृंद व विद्यार्थी उपस्थित होते शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रम संपन्न झाला.