🔥पर्यवेक्षक पदाची मान्यता व नियमित वेतनासाठी सौ. रत्नमाला मेढे यांचे धरणे आंदोलन.🔥भीम आर्मी (भारत एकता मिशन) चा जाहीर पाठिंबा.
वर्धा -/ सौ. रत्नमाला मेढे यांना पर्यवेक्षक पदाची मान्यता देऊन नियमित वेतन मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी त्यांनी दिनांक 8/01/2025 पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर विविध पुरोगामी संघटनांच्या सहकार्याने धरणे आंदोलन सुरू केले आहे. सदर प्रश्न गेल्या एक वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित असून संबंधित प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.या प्रकरणाची माहिती भीम आर्मी (भारत एकता मिशन) संघटनेने घेतली असता, सदर विषय शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मा. अनुसूचित जाती-जमाती आयोग तसेच शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी याबाबत निर्णय देऊन न्याय देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही, अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.अनुसूचित जाती-जमाती आयोगाने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निर्णय घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असताना, प्रशासनाकडून होत असलेला विलंब हा अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलक व संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सौ. रत्नमाला मेढे यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.या अन्यायाविरोधात भीम आर्मी (भारत एकता मिशन) ने जाहीर पाठिंबा दर्शवून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे(रावण) ,जिल्हा संघटक आशिष सलोडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुषार पाटील, जिल्हा महासचिव अलकेश पाणबुडे, बबलू राऊत,शुभम डुबडूबे,आदर्श वाघमारे,अनुराग डोंगरे,अवि मनवर, अमोल तामगाडगे,रोशन झामरे, सनी खैरे इत्यादी कार्यकते उपस्थित होते.