पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यांचा तळेगावात जाहीर निषेध…..

0

तळेगाव -/ श्यामजीपंत येथे 27 एप्रिल रोजी सायंकाळी सर्व पक्षीय व गावातील सर्व नागरिकांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबद्दल सर्वांनी जाहीर निषेध व कॅन्डल मार्च काढण्यात आला देशाची अखंडता व एकतेला हानी पोहोचविण्याच्या उद्देश्याने पाक पुरस्कृत आतंकवाद्यांनी निष्पाप भारतीय नागरिकांचा जीव घेतला, अश्या भ्याड हल्ल्याचा आज निषेध केला,मृतकांना मौन श्रद्धांजली वाहिली, व भारतीय यंत्रणेच्या पाठीशी हा देश खंबीरपणे उभा आहे हा संदेश पाकड्यांना सर्व तळेगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी दिला, यावेळी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते, सामाजिक संघटना प्रतिनिधी,मंडळाचे कार्यकर्ते व बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते..
सर्व आयोजन जंगल सत्याग्रह स्मारक समिती, तळेगाव व समस्त गावकरी तळेगाव यांच्या तर्फे जाहीर निषेध करण्यात आला.

गजेंद्र डोंगरे साहसिक News-/24 तळेगाव वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!