पांदण रस्त्यासाठी आमदार दादाराव केचे यांना दिले निवेदन
पांदण रस्त्यासाठी आमदार दादाराव केचे यांना दिले निवेदन
प्रतिनिधी / आर्वी
ग्रामपंचायत बेनोडा अंतर्गत मौजा माटोडा येथील शेतापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पांधण रस्त्याचे मातीकाम व खडीकरण करण्यात यावे. यासंदर्भात आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. दादारावजी केचे यांना गावकऱ्यांनी निवेदन व ग्रामपंचायतचा ठराव दिला.
ग्रामपंचायत बेनोडा अंतर्गत मौजा माटोडा येथील संदिप लोखंडे यांचे शेतापासून ते मौजा खडकी शिव पांधन पर्यंत रस्त्याचे खडीकरण व मातीकाम करणे, स्मशानभूमी माटोडा पासून ते नागोराव चांभारे यांचे शेताच्या अंतिम टोकापर्यंत रस्त्याचे खडिकरण करणे अशा कामाचे निवेदन व ग्रामपंचायत ठराव आमदार महोदयांना गावकऱ्यांनी दिला. या रस्त्यावरुन गावातील तब्बल १००० हेक्टर शेतीचे वाहतुकीचे वर्दळ आहेत. त्यामुळे पावसाळ्यात किंवा पाऊस असल्यावर या पांधण रस्त्यावरुन साधे चालणे देखील शक्य होत नाही. त्यामुळे हे दोन्हीही रस्ते अत्यावश्यक आहे. त्यामुळे यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावे व या दोन्ही पांधण रस्ते मातीकाम व खडीकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सोबत ग्रामपंचायत ठराव देखील देण्यात आले. त्यासोबतच आर्वी ते माटोडा बेनोडा रस्ता सुरळीतपणे मुख्यमंत्री ग्राम सडक निधी मधून मंजूर करुन काम पूर्ण झाले. त्यामुळे आर्वी देउरवाडा रस्त्याचे काम सुरु असल्याने नांदपूर, एकलारा व लाडेगाव या गावातील मोठ्या प्रमाणात लोक आर्वी माटोडा बेनोडा रस्त्यावरुनच जातात त्या सर्वांच्या व गावकऱ्यांच्या वतीने आमदार साहेबांचे आभार देखील व्यक्त केले. आमदार दादाराल केचे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच गावाला शहराला जोडणारा मुख्य रस्ता झाला अशी भावना यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली.
माटोडा बेनोडा या गावातील लोकांशी विशेष ऋणानुबंध आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा विकास करणे हे आपले कर्तव्यच आहे. त्यामुळे आपले पांधण रस्त्याचे काम होईलच अशी प्रतिक्रिया यावेळी आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादाराव केचे यांनी व्यक्त केली.
निवेदन देतेवेळी बुथ प्रमुख प्रविण अरसड, दीपक खुटाडे, नागोराव चांभारे व देवेंद्र अरसड उपस्थित होते.