पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची मनमानी.
प्रतींनिधी/सेलू:
तालुक्यातील घोराड येथे मागील दोन वर्षांपूर्वी यशवंत पाणी वापर व केजाजी पाणी वापर या दोन समितीची पाटबंधारे विभागाने स्थापना केली. परंतु संस्था स्थापन झाल्या तेव्हापासून तर आज पर्यंत समितीने सुचविलेले कामे पाटबंधारे विभागाने केलेली नाही. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेती पिकाला पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी पाणी समितीकडे तसेच पाटबंधारे विभागाकडे केल्या होत्या. परंतु विभागाने त्या तक्रारीला केराची टोपली दाखविली.. एवढेच नाही तर, तेथील शेतकरी तक्रारीची विचारपूस करण्यास गेले असता पाटबंधारे विभागाचे अधिकारी त्यांच्यासोबत असभ्य वागणूक देतात तसेच पाणीवापर समिती हे याच विभागाने स्थापन केली असली तरी मागील दोन वर्षांपासून समितीची सुद्धा कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा मीटिंग या विभागाने घेतली नाही. तसेच या विभागाने घोराड भागात करत असलेल्या कामाकरिता पाणी समितीला विश्वासात न घेता कामे केली व ती कामे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आणि वापर समितीने केला आहे. यामुळे दोन्ही पाणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जाऊन राजीनामे दिलेत. तसेच या विभागाने केलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी प्रशांत गोमासे, हरी महाकाळकर, सतिष पिसे, शालीक सुरकार, दिलीप पोहाणे, प्रवीण खोपडे,गोपाळ माहुरे, जितेंद्र टेकाडे, किशोर माहुरे,आदी सदस्यांनी केली आहे