🔥माजी सरपंच लता कडताई,बांबरडा, सरपंच संगीता कदम थार यांनी पाणी टंचाई वर समस्या चा वाचला पाढा.
आष्टी शहीद -/ तालुक्यातील माळरान भागात वसलेल्या बोरखेडी, बांबरडा, चामला या तीनही गावात पाणी टंचाई समस्या पाहण्यासाठी वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी जतीन रहेमान यांनी दि. 1फेब्रुवारी रोजी अचानक भेट दिली दोन्ही गावातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून माहिती जाणून घेतली.
सविस्तर असे कि,
आष्टी तालुक्यातील डोंगर माथ्यावर व माळरान माथ्यावर वसलेल्या बांबरडा, थार, चामला गावात आता पासून विहिरी कोरड्या पडल्या असून तीनही गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.बोरखेडी येथील पाणी समस्या दै.साहसिक NEWS-24 नि प्रकाशित करताच वर्धा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी जतीन रहेमान यांनी धावती भेट बांबरडा व चामला गावात येऊन घेतली.बांबरडा येथील ग्रामपंचायत अधिकारी अनुराधा धारपुरे,माजी सरपंच लता कडताई, पोलीस पाटील मोहित बगलेकर,यांनी अधिकाऱ्यांसमोर समस्या चा पाढा वाचला.चार दिवसाने पिण्याचे पाणी आता गावात उपलब्ध होणार ही समस्या मांडण्यात आली.कापीलेश्वर तलावातून थार व बोरखेडी गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली.
चामला गावात भेट दिल्यावर सरपंच संगीता कदम, उपसरपंच संदीप परतेती, ग्रामपंचायत सदस्य मधुकर मोकद्दाम यांनी चामला गावातील पाणी टंचाई कायमची दूर करा अशी मागणी लावून धरली.अधिकारी जतीन रहेमान यांनी समस्या ऐकून घेत उपाय योजना करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी आष्टी पंचायत समिती चे विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण, धीरज परंडे अभियंता पाणी पुरवठा विभाग, किन्नके अभियंता पाणी पुरवठा विभाग कारंजा, थार ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत अधिकारी अस्विन वानखडे, पोलीस पाटील गंगाधर बिटणे, चंद्रशेखर बाबरे, हर्षल कालोकर, गोविंदराव मदनकर, वामनराव ढोरे, दिलीप चाफले, वसंत बिटणे, संतोष वानखडे, ग्रामपंचायत कर्मचारी सुरचन धुर्वे, जीवन बगलेकर, नरेंद्र चांदिवले,पत्रकार शिवाजी चांदिवले,नरेश भार्गव व इतर गावकरी उपस्थित होते.