आष्टी शहीद -/तालुक्यातील चामला गावातील संजय नानाजी राऊत यांच्या घरांची भिंत पावसाच्या पाण्याने कोसळल्याची घटना घडल्याने राऊत परिवार उघड्यावर आला असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही. सविस्तर असें कि,आष्टी तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे.जांब नदी ला पूर आला असून दुथडी भरून वाहत आहे. रोज च्या पावसाने दैनंदिन जीवनमान ठप्प झाले असून गावातून तसेच शेत शिवारातून पाणी वाहत आहे.लहान पिके जमीनदोस्त असून गावातील भिंत ही आता तग धरू शकतं नाही. अशातच चामला गावातील संजय नानाजी राऊत यांच्या भिंतीवर पाणी मुरल्याने भिंत जमीनीवर कोसळली आहे.दैव बालवात्तर म्हणून जीवितहानी झाली नाही. घटनेच्या दिवशी राऊत परिवार हा वर्धा यां शहरात मुक्कामी होता. यां घटनेची माहिती तहसीलदार यांना देणण्यात आली असून तलाठी शेख हसीब, कोतवाल उमेश बिजवे यांनी गावात येऊन घराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला.नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.