🔥आष्टी येथील बँक ऑफ इंडिया च्या वतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ.
आष्टी (शहीद)-/ येथील येथील बँक ऑफ इंडिया शाखेद्वारे पिलापुर (एनाडा) येथील मृत्यू पावलेल्या महिला रेखा धनराज धुर्वे (वय ३९ वर्षे) यांना विम्याच्या पोटी दोन लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला. स्वर्गीय रेखा धनराज धुर्वे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांनी आष्टी येथील बॅंक आॅफ इंडीयाचे बीसी ( व्यवसाय समन्वयक) मनोज बोंदरकर यांच्या मार्फत त्यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा काढला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सदर योजनेतून मिळालेल्या लाभातून त्यांच्या कुटुंबाला आता खूप मोठा हातभार होणार आहे .त्यांचे पती धनराज गोविंदराव धुर्वे यांना नुकताच शाखा व्यवस्थापक श्री नवीन चंन्द्रा यांच्या हस्ते दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.यावेळी बॅंकेचे कर्मचारी सारीका वासनीक , लिना नंदनवार,गायत्री कठडे,खुशाल मेहता, प्रदीप रोडे,मंगेश चन्ने,बीसी मनोज बोंदरकर यांच्या सह इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.