वर्धा -/जिल्ह्यातील सुपरिचित व सुप्रसिद्ध कराटे खेळाडू, तसेच स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडियाचे ब्लॅक बेल्ट, चॅम्पियन टीम मेंबर व कराटे डो स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे चॅम्पियन खेळाडू पियुष सुजित हावलादार यांनी स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा संचालित आंतरशालेय कराटे क्रीडा स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातून प्रथम स्थान प्राप्त करून नागपूर विभागीय स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले नागपुर विभागीय स्पर्धेतही प्रथम स्थान प्राप्त करून महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले असेच महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेतही प्रथम स्थान प्राप्त करून राष्ट्रीय आंतरशालेय कराटे क्रीडा स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.आंतरशालेय राष्ट्रीय कराटे क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 9 ते 13 डिसेंबर 2024 ला स्थळ त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नवी दिल्ली येथे करण्यात आले होते या स्पर्धेत भारत ज्ञान मंदिरम या शाळेत शिकत असणारा इयत्ता 11वीचा विद्यार्थी पियुष हावलदार यांनी 17 वर्षाआतील मुले, 74 ते 78 किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत कास्यपदक प्राप्त केले. 17 वर्षाआतील मुलांच्या गटात मेडल प्राप्त करणारा पियुष हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू ठरला.राष्ट्रीय पदक प्राप्त करून मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 ला SGFI चे नॅशनल मेडल घेऊन दिल्लीतून वर्धेत परत आला यानिमित्ताने त्याच्या परिवारातर्फे स्वागत रॅलीचे आयोजन वर्धा मेन रेल्वे स्टेशन तिकीट घर समोर करण्यात आले होते. या प्रसंगी राष्ट्रीय खेळाडू पियूष हावलादार याला आशीर्वाद रुपी शुभेच्छा देण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील अनेक कराटे प्रशिक्षक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था संचालक, समाजसेवक व क्रीडा प्रेमींनी रॅलीत सहभाग दर्शवित विजयोउल्हास साजरा केला.वर्धा जिल्ह्याला मागील जवळपास दहा वर्षानंतर आंतरशालेय राष्ट्रीय कराटे क्रीडा स्पर्धेत मेडल मिळाल्याबद्दल पियूष हावलादार यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक शिहान मंगेश भोंगाडे व माता-पितांना दिले. या घवघवीत यशाबद्दल कराटे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय संघटना पदाधिकारी व चाहत्या वर्गाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.