आर्वी -/ विधानसभा क्षेत्रातील आष्टी तालुक्यातील भिष्णूर येथील श्री गोविंद प्रभू देवस्थानासाठी १८ कोटी ९७ हजाराच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. निधी मिळण्यासाठी सुमित वानखेडे यांना महानुभाव संप्रदायातील अनुयायांनी मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुशंगाने वानखेडेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे महानुभाव संप्रदायानी केलेल्या मागणी संदर्भात मागणीची पुर्तता व्हावी म्हणून आग्रही भूमिका घेतली होती. त्या मागणी संदर्भात श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाच्या औचित्य साधून १८ कोटी ९७ लाखांचा निधी भिष्णूर साठी उपलब्ध झाल्याने पुन्हा सुमित वानखेडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.श्री गुरू गोविंद प्रभूंचे चरणांकीत स्थान भिष्णूर असल्याने महानुभाव संप्रदाया करीता अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकांचे श्रद्धास्थान श्री गोविंद प्रभू असल्याने तिथे वर्षेभर भाविक भक्तांची रेलचेल असते. सोबतच महानुभाव संप्रदायातील अनुयायांसाठी या स्थानाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे संप्रदायातील धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्या करीता मोठ्या प्रमाणात समाज बांधवांचा जमावडा होतो.धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सुधारीत व्यवस्था केल्यास श्री गोविंद प्रभू देवस्थानाच्या विकासाला चालना मिळेल. म्हणून सुमित वानखेडे यांनी महानुभाव संप्रदायाची मागणी विकास आराखड्यासह शासन दरबारी सादर करून वेळोवेळी पाठपुरावा केला होता. वानखेडेंनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. निधी मिळत असल्याने गावकरी, भाविक भक्त, महानुभाव संप्रदायातील अनुयायांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच महत्वपूर्ण काम मार्गी लावल्याने सुमित वानखेडे यांचे कौतुक करत आभार मानले आहेत. नेहमीप्रमाणे प्रत्येक समाजात घटकांना भेडसावत असलेले विविध प्रश्न मार्गी लागत असल्याने आर्वी विधानसभा मतदारसंघांतील गाव खेडे, शहरात सुमित वानखेडेंचा चांगलाच बोलबाला आहे.