🔥सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांने सारंगपुरी तलावाचे होणार पुनरुज्जीवन.
🔥तब्बल 13.83 करोड रुपयांचा निधी मंजूर.
आर्वी -/आर्वीकरांसह परीसरातील लोकांचा जिव्हाळ्याचा असलेला सारंगपुरी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी सुमित वानखेडे यांनी केलेल्या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश मिळाले आहे. यासाठी आर्वी नगरपरिषदला तब्बल 13.83 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत सारंगपुरी तलावाचे पुनरुज्जीवन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे डी- सिल्टिंग, उत्खनन आणि गॅबियन धरणाचे मजबुतीकरन, रिटेनिंग वॉल, गार्डन,भव्य 3 गेट, सायकल पथ, सोलर पॅनल युक्त पार्किंग शेड, तलावासाठी एमएस रेलिंग, टॉयलेट ब्लॉक, पेर्गोला, इलेक्ट्रिकल वर्क अश्या 13.83 कोटींचे कामे होणार आहे. तसेच जॉगिंग ट्रॅक, फुड कोर्ट, भव्य फाऊंटन, बोटींगची सुविधा, मुलांना खेळण्यासाठी प्लेइंग एरिया, खाण्या पिण्यासाठी पाण्यावर तरंगणारे फ्लोटिंग रेस्टॉरंट, प्रेक्षागृह, प्रतिक्षालय, स्त्री व पुरुष प्रसाधनगृह इ. साकार होणार असून लवकरच सारंगपुरी तलाव हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीला येईल असे सुमित वानखेडे यांनी सांगितले आहे.आर्वीकरांना ब्रिटिश काळापासून सारंगपुरी तलावातून पाणी पुरवठा होत होता. ती पाणी पुरवठा योजना पुर्णपणे द्रव पदार्थ गुरुत्वाकर्षणाच्या तत्वावर कार्यान्वित होती. आर्वी शहरातील एक विरंगुळेचे सहल स्थळ म्हणून शाळकरी व नागरीक फेरफटका मारत होते. काही सोईंचा अभाव असल्याने काही बाबींचा त्रास होत होता. आर्वीकरांना या तलावाचे ऐतिहासिक महत्त्व असल्याने याचे पुनरुज्जीवन व्हावे असे नागरीकांना वाटत होते. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्या तलावाला इच्छाशक्ती अभावी कायमच उपेक्षित ठेवले.सुमित वानखेडे हे आर्वीत लहानाचे मोठे झाल्याने येथील प्रश्नांची जाण होती. अशातच काही नागरीकांनी त्यांच्याकडे तलावाच्या पुनरुज्जीवनाची मागणी केली. सुमित वानखेडे यांनी लगेच नगरपरिषदला प्रस्ताव बनवायला सादर करण्यास सांगितले. त्या प्रस्तावाचा पाठपुरावा वेळोवेळी शासनदरबारी केला. त्यातूनच आर्वी नगरपरिषदला हा निधी उपलब्ध झाला आहे.आर्वीकरांचा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लागल्याने समाधान व्यक्त करीत सुमित वानखेडे यांचे कौतुक करत आभार मानले आहेत.