पुरामुळे शेती पिकाचे नुकसान,…

0

देवळी डिगडोह मार्गावरील यशोदा नदीचा पूल झाला शतिग्रस्त..

देवळी -/ तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बऱ्याच भागामध्ये शेती पिकाचे व नदी नाल्यांवरील पुलांचा काही भाग शतिग्रस्त झाला आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या यशोदा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या शेतामध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेती पिकांचे बऱ्याचपैकी नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.पुरामुळे नदीकाठच्या शेतातील १०० एकर च्या वरती पुरामुळे शेती पिकांना फटका बसलेला आहे. देवळी ते डिगडोह या मार्गावरील यशोदा नदीवरील पुलाचा काही भाग पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने रहदारीला अडचण निर्माण झाली आहे डिगडोह येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार डिगडोह येथील प्रमोद बुरानकार,सुनील बुरानकार,सुरज डुकरे,किसना जबडे,गणेश डुकरे,श्याम कतले, रुपराव भोगेकार,प्रवीण कापसे, मनोज डुकरे,वनराज लोखंडे, यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्याचे कळविण्यात आलेले आहे.तसेच येसगाव,मुरदगाव, नागझरी, कवठा, या भागाकडे जोरदार पाऊस बरसल्याने या भागातील शेतामध्ये बऱ्याच पैकी पाणी साचले आणि यशोदा नदीला पूर आला व शेती पिकाचे नुकसान झाले.शासनातर्फे पिक पाहणी करून मदत द्यावी आणि डोगडोह ते देवळी यशोदा नदीवरील शतिग्रस्त झालेला पूल दुरुस्त करावा अशी डिगडोह गावातील नागरिकांनी मागणी केली आहे.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!