पुलगाव येथील डॉक्टर दाम्पत्याच्या ‘ समीरण’ला मायदेशी परतण्याची ओढ

0

पुलगाव / प्रतिनिधी :

येथील मुख्य मार्गावरील रहिवासी असलेल्या डॉ . विजया आणि डॉ . चंद्रशेखर काळे या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा समीरण काळे हा युक्रेनमध्ये पाचव्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे . पण रशियाने युक्रेनवर हल्ला चढवित युद्धाची घोषणा केल्याने सध्या पुलगावच्या डॉक्टर दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा युक्रेनमध्येच अडकला आहे . समीरण हा युक्रेन देशातील ओडेसा या शहरात सुरक्षित असला , तरी त्याला मायदेशी परतण्याची ओढ आहे .
तर काळजाचा तुकडा युक्रेनमध्ये अडकला : सुखरूप असला तरी आई – वडिलांना सतावतेय चिंता.
युद्धामुळे नेस्तनाबूत होत असलेल्या देशात असल्याने आईवडिलांना मुलाच्या सुखरूपते बाबतची चिंता सतावत आहे .
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत समीरणच्या वडिलांनी शनिवारी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपला मुलगा युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे .
कुटुंबीयांना देतोय तेथील परिस्थितीची माहिती ■
युक्रेनमधील ओडेसा येथील नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत पुलगाव येथील समीरण चंद्रशेखर काळे हा पाचव्या वर्षाच वैद्यकीय शिक्षण घेत आहे . मागील पाच वर्षांपासून तो युक्रेनच्या शहरात राहत असून सध्या त्याच्यासोबत त्याचे काही मित्र आहेत . समिरण आईवडिलांशी फोनवरून संपर्क करून युक्रेनमधील परिस्थिती कशी क्षणाक्षणाला बदलत आहे याची माहिती देत आहे . ओडेसा शहरापासून काही अंतरावर सध्या हल्ले होत असले तरी आपण सध्यस्थितीत सुखरूप असल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगिल्याचे डॉ . चंद्रशेखर काळे यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!