पैठण -/ येथील स्वस्त धान्य दुकान क्र. १ चे दुकानदार यांनी अंत्योदय कार्ड धारक खालेद जावेद आंबेकर या ग्राहकास २०२२ पासून ३५ किग्रॅ.च्या ऐवजी फक्त २० किग्रॅ.धान्य दिले असून आता तर त्यांचे नावच परस्पर वगळण्यात आले आहे.यात पुरवठा अधिकारी व जितके कर्मचारी समाविष्ट आहेत त्या सर्वांवर कारवाई करुन खालेद जावेद आंबेकर यांचे नाव पुन्हा योजनेत समाविष्ट करण्यात यावे. पैठण शहरामध्ये जे दुकानदार नियमांचे पालन करत नाही त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी व त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे.असे लेखी निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.जर तहसीलदार यांनी याबाबत काही ठोस पावले उचलली नाही तर एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष नीसार बागवान यांनी लवकरच यासाठी शहरस्तरावर मोठे आमरण उपोषण करण्यात येईल असे सांगीतले.