🔥पैश्याचा वादातून लोखंडी रॉडने वार करून इसमाची निर्घृण हत्या.🔥आरोपी अटक – वणी शहरात भितीचे वातावरण.
वणी -/ येथील बाकडे पेट्रोल पंपाजवळ संजय ऑटोमोबाईल दुकाना समोर दिनांक 18/2/26 चे रात्री 9.30 वाजताचा दरम्यान मल्लेश संजय नेरकुंटलावर याची त्याचा मित्र मंगेश उर्फ भुऱ्या डाखरे वय 26 यांनी पैश्याचा वादातून लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सदर घटनेने वणी शहरात भितीचे वातावरण पसरले. पैश्याच्या किरकोळ वादातून ही रक्तरंजित घटना घडल्याची तक्रार मृत्कचा भाऊ राजेश संजय नेरकुंटलावर यांनी वणी पोलीस स्टेशन दिली. मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशी की,मृत्काचा भाऊ राजेश नेरकुंटलावर यांनी समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवुन जबानी रिपोर्ट दिली की मी व माझी आई बानू संजय नेरकुंटलावार, वडील संजय मल्लया नेरकुंटलावार तसेच माझा मोठा भाऊ नामे. मल्लेश संजय नेरकुंटलावार वय 24 वर्षे असे चार व्यक्ती वरील ठिकाणी राहतो व मजुरीचे काम करतो. माझा भाऊ मल्लेश संजय नेरकुंटलावार यांचा मित्र मंगेश उर्फ विलास डाखरे हा कधीकधी आमचे घरी येत होता त्यामुळे मी मंगेशला ओळखतो. मंगेश व मल्लेश हे दोघे चांगले मित्र होते. काही दिवसांपूर्वी मल्लेश व मंगेश दोघेही पछमडी मध्यप्रदेश येथे फिरायला जाऊन आले होते. माझा भाऊ मल्लेश ने काही दिवसांपूर्वी मला सांगितले की मल्लेशने 7000 रुपये मंगेश उर्फ भुऱ्याला दिले होते. ते पैसे मल्लेश भुऱ्याला परत मागत होता. परंतु मंगेश उर्फ भुऱ्याने ते पैसे खर्च केले असल्याने मंगेश हा मल्लेशला पैसे परत करत नव्हता त्यामुळे दि. 18/02/2026 रोजी दुपारी दोघांचा वाद झाला होता. मल्लेश व मंगेश एकमेकांचा जिव घेण्याचे बोलत होते. दि. 18/02/2026 रोजी मी माझे ट्रॅव्हल्सचे काम करून वणी येथे बालाजी ट्रव्हल्यचे ऑफिसवर पैशाचा हिशोब देत होतो. तेव्हा रात्री 09.30 वाजताचे दरम्यान मला माझे नातेवाईक रितिक लक्ष्मण मामीडवार यांचा फोन आला की माझा भाऊ मल्लेशला मंगेश उर्फ भुऱ्या विलास डाखरे हा संजय ऑटोमोबाईल चे शटर समोर मारत आहे. त्यामुळे मी तेथे गेलो असता मंगेश उर्फ भुऱ्या विलास डाखरे हा त्याचे हातात लोखंडी सलाख घेऊन माझा भाऊ मल्लेश संजय नेरकुंटलावार याचे डोक्यात वार करून डोके चेंदामेंदा करून जिवानी शी ठार मारले. तेव्हा लोकांची गर्दी जमा झाल्याने मंगेश तेथून पळून गेला. तेव्हा तेथे सचिन वांढरे पोलीस तेथे आल्यानंतर मल्लेशला सरकारी दवाखाना येथे नेले. तेथे डॉक्टरांनी मल्लेश हा मरण पावला असल्याचे सांगितले. माझा भाऊ मल्लेश संजय नेरकुंटलावार याला त्याचा मित्र मंगेश उर्फ भुऱ्या विलास डाखरे याने पैशाचे वादाचे कारणावरून लोखंडी सलखने डोक्यात वार करून डोके चेंदामेंदा करून जिवानीशी ठार मारले आहे. त्यामुळे मंगेश उर्फ भुऱ्या विलास डाखरे वय 26 वर्ष रा. पळसोनी ता वणी जि यवतमाळ याचेवर कार्यवाही होणे करिता रिपोर्ट देत आहे. अशा फिर्यादीचा जबानी रिपोर्ट वरुन वणी पोलिसांनी कलम 103 (1) BNS नुसार सदरचा गुन्हा नोंद करून घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी मंगेश उर्फ भुऱ्य डाखरे वय 26 याला अटक करण्यात आले.
सदर खुनाच्या घटने मुळे वणी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर घटनेचा पुढील तपास वणी ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी सपोने प्रियंका चौधरी सह वणी पोलीस करीत आहे.