पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांचा लाडका ठाणेदार श्याम सोनटक्के विरोधात कारवाई का नाही ? अन्यायग्रस्त पोलिसांचा टाहो

0

प्रतिनिधी / यवतमाळ :

स्थानिक पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांचा क्र. १ चा वसुली अधिकारी म्हणून वणी चा ठाणेदार श्याम सोनटक्के उर्फ सचिन (वाझे) असल्याचे आता सिद्ध झाले आहे. दै. साहसिक वृत्तपत्राने पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ व त्यांचे सहकारी श्याम सोनटक्के, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख रामकृष्ण महल्ले व अन्य सहकार्‍यां विरोधात भ्रष्टाचाराची मालिका चालविली होती. दि. २९ जानेवारी २०२२ रोजी डीआयजींच्या पथकाने वणी शहरातील तीन मटका अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये लाखो रुपये जप्त करण्यात आले. तर दोन संबंधित दुकानावर धाड टाकून लाखो रुपयाचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला होता. काही महिन्यापुर्वीच वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक असणारे श्याम सोनटक्के यांनी पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांची अवैध्य वसुलीची संपुर्ण जबाबदारी स्विकारली होती. यामुळे प्रचंड स्पर्धेनंतरही ‘हेवीवेट’ म्हणून ओळखले जाणारे वणी पोलिस स्टेशनचा ठाणेदार पद श्याम सोनटक्के यांच्या पदरात पडले. कारण वणी पोलिस स्टेशन मधून दर महिना ३० ते ४० लाख रुपयाची अवैध्य हप्ता वसुलीचे काम ‘श्याम सोनटक्के’ करीत आहे. यामुळे डीआयजी च्या पथकाने वणी शहरात लाखो रुपयाची रोख रक्कम अवैध्य व्यावसायिकाकडून जप्त केली. परंतू ठाणेदार श्याम सोनटक्के विरोधात कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. यावरुन पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळाचा यांची हप्ता वसुली करण्याची जबाबदारी वणी ठाणेदारीावर होती. ४ निलंबित केलेल्या कर्मचार्‍याचा अवैध्य धंदेवाल्यांशी कोणताही संबंध नसताना त्या कर्मचार्‍यांना निलंबित करुन पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी आपले प्रेम ‘श्याम सोनटक्के’ वर असल्याचे दाखवून दिले. मागील ३ महिन्यापासून पाय प्रâॅक्चर झालेल्या व वैद्यकीय रजेवर असलेल्या पोलिस कर्मचार्‍याला निलंबित करताना पोलिस अधिक्षकांना ‘‘जणाची नाही तर मनाची लाज’’ वाटली नाही का ? असा प्रश्न यवतमाळकर विचारत आहे. १९ पोलिस कर्मचार्‍यांची ३ वर्षासाठी वेतन वाढ रोखली. या प्रकरणी डी.बी. पथक इंचाजी एएसआय सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, पंकज उंबरकर व डी.बी. पथकाचे इकबाल शेख यांना निलंबित करण्यात आले. पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी यापुर्वी जिल्ह्यातील एसडीपीओ सह ठाणेदारांना अवैध्य धंदे नियंत्रित करण्याचे पत्र दिले होते. तसेच जिल्हा केद्रांवरील पथकांकडून धाडी यशस्वी झाल्यास नियंत्रण कक्षात बसविण्यात येईल. असा इशारा दिला होता. त्याच पत्राचा धागा पकडीत एसडीपीओंनी अधिनस्त ठाणेदारांना तसेच पत्र स्वत:च्या स्वाक्षरीनिशा दिले होते. ठाणेदारांनी तोच कित्ता गिरवित एपीआय. पी.एस.आय आणि बिट जमादारांना तसे पत्र वितरित केले होते. त्याच पत्रांचा बागुलबुवा करीत वणी ठाणेदार स्वत:च्या बचावाचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. परंतू ‘‘ एकाला मायचा व दुसर्‍याला बापाचा’’ अशी वागणूक अन्य पोलिस ठाणेदार यांच्याशी पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी केली आहे. जो नियम अन्य ठाणेदारांना लागतो तोच नियम वणी ठाणेदार श्याम सोनटक्के यांना लागू का नाही ? अशी चर्चा सध्या यवतमाळ जिल्ह्यातील ठाणेदार व पोलिस कर्मचारी करीत आहे. वणी ठाणेदार श्याम सोनटक्के यांना पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांचे संपुर्ण ‘‘गुप्त गोष्टी’’ माहित असल्यामुळे वणी लाचखोर ठाणेदार श्याम सोनटक्के यांचेवर डीआयजी व पोलिस अधिक्षक यांनी कोणतीच कारवाई केली नाही.
(क्रमश:)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!