पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या कार्यावाहिने प्रभावित होवून पोलिस अधीक्षक यांनी पोलिस निरीक्षकांची बोलविली तातडीची बैठक
राळेगाव/नितिन हिकरे:
पोलिस उपमहानिरीक्षकाच्या पथकाने शनिवार, २९ जानेवारीला वणी, जिल्हा यवतमाळ येथे चार मटका अड्ड्यांवर धाडी टाकून ४३ जुगार्यांना ताब्यात घेतले. या कार्यवाईने ६ दुचाकी व मोबाईल संचासह ४ लाख ५७ हजार १७० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दिनांक: २९ जानेवारी च्या दिवशी पोलिस उपमहानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र यांच्या नियंत्रणात आय.पी.एस. गोहर हसन यांनी राबविण्यात आलेल्या या धडाकेबाज कार्यवाईने अवैध व्यावसायिकात व यवतमाळ पोलिस खात्यात हडकंप माजला असून वरिष्ठ अधिकार्यांनी स्वत: केलेल्या कार्यवाहिने यवतमाळ पोलिस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या कार्यवाहिने यवतमाळ पोलिस विभागातिल जबाबदार पोलिस अधीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्याकडे जनतेचा पाहण्याचा दृष्टीकोणसुद्धा बदलल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पोलिस उपमहानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र यांच्या या कार्यवाहीमुळे यवतमाळ पोलिस विभाग मोठ्या स्तरावर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या अपेक्षेऐवजी गुन्हेगारी प्रवृत्तीला वाव देण्यात आघाडीवर असल्याचे चित्रीकरण सर्वत्र असल्याचे दिसते. यातही महत्वाचे म्हणजे यवतमाळ पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कार्यवाही नंतरसुद्धा जिल्ह्यात अवैध व्यवसाय लगेचच पूर्ववत सुरू होते याकडे जनतेचे विशेष लक्ष आकर्षित झालेले आहे.
आता अशाप्रकारे वरिष्ठांकडून झालेल्या प्रभावी कार्यवाहीमुळे यवतमाळ पोलिस विभागाचे पोलिस अधीक्षक यांनी अगदी तातडीची बैठक बोलावून जनतेसमोर कोणते नवीन चित्र दर्शविते याकडे जनतेचे लक्ष केन्द्रित झालेले आहे.