🔥पोलीस उपनिरीक्षक भागानगरे यांच्या घरी अस्वलीने ठोकला मुक्काम…तीन तास अनुभवला थरार
🔥बोरखेडी येथे दि. 4 रोजीच्या पहाटेची घटना.
आष्टी शहीद -/ आष्टी तालुक्यातील घनदाट जंगलात वसलेल्या बोरखेडी येथील पोलीस उपनिरीक्षक अक्षय भागानगरे यांच्या नवीन घरासाठी खोदून ठेवलेल्या कौलॅम च्या खड्ड्यात तब्बल तीन तास मुक्काम ठोकला आणि गावातील कुत्र्याच्या भुकन्याच्या कल्लोळमुळे तिने मध्य वस्तीत घुसून जंगलाच्या दिशेने निघून गेली. हा सर्व प्रकार पोलीस उपनिरीक्षक अक्षय भागानगरे यांनी उघड्या डोळ्याने पाहिला.
सविस्तर असे कि,
आष्टी ते कारंजा (घा.)मार्गांवर सिमेंट रस्त्याचे बांधकाम मध्य रात्री करण्यात येत असल्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात आता गावात जात आहे. बोरखेडी गावाजवळ असलेली जांब नदी ला जानेवारी ते मार्च महिन्यात पाणी असते. नेमके याच महिन्यात जांब नदीचे पाणी चोरून नेल्यामुळे जांब नदी पूर्ण कोरडी झाली. जंगलात पाण्याचे श्रोत नसल्याने वन्य प्राणी आता गावाच्या दिशेने यायला लागले आहेत. दि. 4रोजी पहाटे असवलं बोरखेडी येथील हनुमान मंदिर समोर दरवाज्याला धडका मारत होती. दरवाजा हा लोखंडी असल्यामुळे धडकचा आवाज कशाचा म्हणून शेजारी ग्रामपंचायत सदस्य केशव कुंबरे यांनी बाहेर येऊन पाहिले तेव्हा असवलं धडक देत उभी होती. कुत्र्याच्या भुकण्यामुळे अस्वल पुढे पोलीस उपनिरीक्षक अक्षय भागा नगरे यांच्या घरी बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी एका खड्ड्यात येऊन पडली तेथून बाहेर आल्यावर उडया मारत होती. आवाज कशाचा म्हणून झोपेतून पोलीस उपनिरीक्षक अक्षय भागा नगरे हे उठले आणि पाहतो तर पुढे असवलं उभी होती. असावालीला पुढे पाहून या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील प्रणाली लोमटे यांना फोनवरून दिली. शेजारी लोकांनी अस्वल पाहण्यासाठी घटना स्तळी धाव घेतली तेव्हा ती अस्वल हनुमान मंदिराच्या दिशेने धावत सुटली आणि एका व्यक्तीच्या अंगावर धावली. हा सर्व प्रसन्ग पोलीस उपनिरीक्षक यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. या घटनेचीमाहिती आष्टी वनविभागचे वन परीक्षेत्र अधिकारी उईके यांना देण्यात आली. अस्वल गावात येऊन कुणावरही हल्ला करून ठार करू शकते. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी अस्वल जे्रबंद करा अशी मागणी बोरखेडी येथील गावकरायणी वनविभागाकडे केली आहे.