सेलू -/ पोलीस स्टेशन सभागृहात पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील पोलीस पाटलांचा सन 2023 आणि 2024 या वर्ष्या मधील सर्व सन समारंभ जसे कि नवरात्री, पोळा,होळी,रमजान,राम जन्म,गणेश उत्सव बंदोबस्त शिवाजी महाराज जयंती बंदोबस्त बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव बंदोबस्त बुद्ध पौर्णिमा बंदोबस्त तसेच 2024 च्या लोकसभा निवडणूक या दरम्यान कुठलाही कायदा आणि सु्वेस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ देता चोख बंदोबस्त देऊन पोलिसांना सहकार्य करत आपल्या गावाची जबाबदारी पार पाडली त्याबद्दल मा. ठाणेदार राणे साहेब सेलू यांचे कडून सर्व पोलीस पाटील यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला असून येणाऱ्या निवडणुकानमध्ये सुद्धा आपण या प्रमाणे आपली जबाबदारी निभवाल याची मला खात्री आहे .असा आशावाद त्यांनी यावेळी वेक्त केला.या कार्यक्रमाचे सूत्र सूत्रसंचालन पोलीस पाटील विजय कोल्हे तळोदी यांनी केले तर आभार अमित लुंगे पोलीस पाटील धानोली मेघे यांनी मानले.यावेळी बहुसंख्यने सेलू पोलीस कर्मचारी हजर होते.