पोलीस स्टेशन बिड्कीन हद्दीतील नागरीकांनी दक्ष राहावे पोलिसांचे आवाहन….

0

बीड़कीन -/ बिड्कीन पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावे व परिसरातील सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन बिड्कीन यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की,सध्या पावसाळा ऋतू चालू असून पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे, पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच सध्या नद्या नाल्यांमध्ये पाणी साचलेले आहेत त्यामुळे शेतामधील किंवा गोठ्यातील विद्युत पुरवठा बाबत काळजी घ्यावी तसेच आपल्या परिसरातील नदी नाल्यात लहान मुले पोहण्यासाठी जातात, त्यांना पोहण्यासाठी जाऊन देऊ नये तसेच आम्हाला पेट्रोलिंग दरम्यान शेत रस्त्यावरती अथवा गोठ्यात जनावरांना असुरक्षितरित्या बांधले दिसून आलेले आहे शेतकरी बांधव आपल्या शेतातील जनावरे मोटरसायकल व इतर वाहने हे असुरक्षित रित्या बांधलेले व ठेवलेले मिळून आले आहेत त्यामुळे चोर या वेळेची संधी साधून आपले जनावर चोरी ,मोटरसायकल चोरी तसेच इतर वाहनाची चोरी करू शकतात. सध्याचे परिस्थितीत मोटरसायकल चोरी व घरफोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आपण सतर्क राहून आपल्या घरातील/ शेतातील वस्तू सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम घरात न ठेवता बँकेत ठेवावी याबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच आपल्या परिसरामध्ये पावसामुळे किंवा हलगर्जीपणामुळे इलेक्ट्रिक शॉक लागण्या सारख्या प्रकार घडून जीवित हानी होणार नाही. याबाबत जनजागृती करून लक्ष ठेवावे तसेच आपल्या परिसरात कोणी संशयित व्यक्ती दिवसा किंवा रात्री मिळून आल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस स्टेशन बिडकीन येथे माहिती द्यावी. पोलिस निरीक्षक प्रमोद पाटिल यांनी असे अवाहन जनतेस केले आहे.

अर्षद शेख साहसिक news -/24 बिडकीन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!