प्रत्येक वार्डात कराटे ची शाखा असणे काळाची गरज – सेन्साई मंगेश भोंगाडे
प्रतिनिधी/ वर्धा :
आजचे युवक – युवती हे सर्व खेळ अँड्रॉइड मोबाईल मध्येच खेळतात. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही, व त्यांच्यात शारीरिक सामर्थ्यही निर्माण होत नाही. करिता प्रत्येक वार्डात कराटे प्रशिक्षणाची शाखा असणे काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्या देशाची युवा पिढी निर्व्यसनी व बलवान घडेल असे प्रतिपादन स्पोर्ट शोतोकान कराटे असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेन्साई मंगेश भोंगाडे यांनी कराटे प्रशिक्षण शाखा उद्घाटन कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना व्यक्त केले.
स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा संलग्नित स्पोर्ट कराटे असोसिएशन द्वारा संचालित कराटे प्रशिक्षण केंद्राच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष मधुकर वानखेडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्पोर्ट शोतोकान कराटे असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सेन्साई मंगेश भोंगाडे, प्रमुख उपस्थिती भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष मुरलीधर कांबळे, महाविहारात धम्म क्लास चालवणाऱ्या उषा म्हात्रे, समता नगर शाखेचे मुख्य प्रशिक्षक सेन्साई सुशांत जीवतोडे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री टेंभरे यांनी तर आभार दीक्षा तडस यांनी मानले. याप्रसंगी चंदा ढोके, मानसी तेलतुंबडे, मनीषा थुल, किरण घोंगडे, दीपाली आगलावे व महावीर बुद्ध विहार येथील इत्यादी महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता असोसिएशन ब्लॅक बेल्ट सेन्साई कार्तिक भगत, सेन्साई अनुज कांबळे, पियुष हावलदार, रुजान बागमोरे, पियुष सिंग, प्रथमेश ढाले, विकास भालकर व आदींनी अथक परिश्रम घेतले.