🔥प्रहार शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्र्याच्या घरासमोर करणार आंदोलन.🔥तीन माकडांची तोंड उघडण्यासाठी कोणता भोंगा वाजवावा, बच्चू कडू यांची सरकारवर टीका ; मेळाव्यात १४ मावळ्यांना केले सन्मानित.
अमरावती -/ अमरावती येथे संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा व विभागीय मेळावा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडला त्यावेळी माजी राज्यमंत्री,पालकमंत्री , आमदार बच्चू कडूंनी राज्य सरकारवर आपल्या भाषणात ताशेरे ओढले.विचार पिठावर दिनेश बुब , संताजी धनाजी पुरस्कार अभियानाचे प्रमुख महेश बडे , पुरस्काराचे निरीक्षक नितीन आगे , प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू जंवजाळ , प्रदेश प्रवक्ता जितू दुधाने , जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसु , मंगेश देशमुख , प्रवीण हेंडवे , नंदू कुवठे , चंदू खेडकर , घनश्याम पेठे , नितीन चौधरी , तुषार तुपटकर , विकास दांडगे , सुरज कुकडे , बंटी रामटेके , उमेश मेश्राम , मोईन अली , श्याम राजपूत , संतोष फाईट, प्रमोद कुराळकर, जोगेंद्र मोहोड , निलेश टापरे आदी प्रहारचे कार्यकर्ते विराजमान होते .
बच्चू कडू यांनी सांगितले की तमिळनाडू सरकारचा अर्थसंकल्प तीन लाख कोटीचा आहे कृषी क्षेत्रासाठी ४००० कोटीची तरतूद आहे उत्तर प्रदेश सरकारचा ८.५ लाख कोटीचा अर्थसंकल्प असताना शेतकऱ्यांसाठी ४५ हजार कोटी रुपये ठेवले आहे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प साडेसात लाख कोटी रुपयांचा आहे पण कृषी क्षेत्रासाठी केवळ ९००० कोटी रुपयांची तरतूद केली जाते कोणी यावर प्रश्न विचारणार आहे कोण या विषयावर पुढाकार घेणार आहे एकही शेतकरीपुत्र बोलायला तयार नाही काही अंधभक्त त्यावरही टाळ्या वाजवताना दिसत आहेत या लोकांच्या टाळक्यात हाणण्याचे काम प्रहार केल्याशिवाय राहणार नाही , अर्थमंत्री अजित पवारला अडीच लाख रुपये पगार तर दिव्यांग यांना पंधराशे रुपये , मोबाईलचा मिडिया म्हणून वापर करा , तसेच निवडलेले संताजी धनाजी पुरस्कारथी अरुण शेवने , पुष्पक खापरे , मंजुषा बोडके , सचिन वैद्य , सागर जैन , वैभव कुमार निमकर , संदेश राठोड , रंजीत लहाने , राहुल मोहितवार , समीर तायडे , सुरज कुबडे , सुरज गहते , गौरव नाईक , धीरज आडे त्याप्रसंगी मोठ्या संख्येने अमरावती , वर्धा , यवतमाळ जिल्ह्यातील प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.