वर्धा -/ प्रहार दिव्यांग क्रांती,वर्धा च्या वतीने जिल्हाधिकारी श्रीमती वनमती सी.यांना प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी होणाऱ्या दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी होणाऱ्या आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आले.निवेदनात आतापर्यंत झालेल्या बैठका,तारांकित प्रश्न, केलेली आंदोलने,काढलेले शासन निर्णय आणि केंद्र शासनाचा दिव्यांग अधिनियम कायदा २०१६ चा संदर्भ देऊन राज्यातील दिव्यांगाना प्रति महिना ६ हजार रुपये पेन्शन तातडीने लागू करण्यात यावी,मानधन दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात उशीरा जमा होते,ते तातडीने व नियमित वेळत देण्यात यावे,उत्पन्नाची अट एक लाख पन्नास हजार करण्यात यावी.मुले २१ वर्षाची झाल्यावर पेन्शन बंद करण्यात येवू नये आदी मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात,असे निवेदनातुन सांगितले आहे.राज्य शासनाने या निवेदनावर लवकरात लवकर विचार करून संपूर्ण मगण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा राज्यातील लाखो दिव्यांगाचा मोर्चा मंत्रालयावर नेण्यात येईल,हे आंदोलन करो या मरो,या पध्दतीचे असणार आहे.यामध्ये काही घटना घडल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व राज्यकर्त्यांची असेल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.जिल्हाधिकारी श्रीमती वनमती सी. यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निवेदनावर प्रहारचे जिल्हाप्रमुख प्रमोद कुऱ्हाटकर्,जिल्हा संघटक आमोद क्षीरसागर,जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सहारे,उमेश खापरे, जिल्हा सचिव सिद्धार्थ उरकुडे,महासचिव सुभाष इंगळे साहेब,सुनील मिश्रा, सचिन पोहाने,अश्विनी गिरडकर,पंकज गावंडे , गोपाल पवार, नितीन बगमारे जयश्री गिरडकर, चिंतामण कुंभारे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुऱ्हाटकर यांनी प्रहारच्या वतीने पालकमंत्री तथा प्रशासन यांना आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या, त्याला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनि दिव्यांगाच्या वतीने करो या मरो या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल त्याची नोंद घ्यावी असा इशारा दिला.तरी सर्व दिव्यांग बंधावानि आपल्या हक्कासाठी 26 जानेवारी 2025 ला सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे उपस्थित राहावे व करो व मरो आंदोलनात सहभाग घेऊन आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यास शासनाला भाग पाडावे.