प्लास्टिक खुले सामन्याचे आयोजन
प्रतिनिधि/ वर्धा:
स्थानिक जय भवानी क्रिकेट क्लबच्या वतीने प्लास्टिकबॉल खुल्या सामन्याचे आयोजन पूलफैल येथील लाला लजपतराय शाळेच्या मैदानावर करण्यात आले. सामन्याचे उद्घाटन भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके, नगरसेवक परवेज हसन खान, इरशाद यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्या सामन्याससाठी पुष्पराज ब्रिगेड टीम व जय मल्हारी क्रिकेट टीम मैदानात उतरली होती. मान्यवरांनी दोन्ही टीमच्या कप्तानांसोबत हात मिळून त्यांचे अभिनंदन केले. टॉस करून सामन्यांना सुरुवात करण्यात आली. खेळाचे आयोजन सोनू उपाध्ये, शुभम, मुकेश पचारे, अजय शेंडे, दर्शन जुनराडे, राजू पात्रे, प्रथम लोंढे, साहिल खंडारे, अरविंद नाडे, गणेश वानखेडे, अमोल ठाकरे, विकी पात्रे, आशिष खंडारे, सौरभ हातागळे, प्रशांत रामटेके, सोनू सहारे, सचिन अरखेल, शेख अल्ताफ शेख यांनी केले.