वर्धा -/ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न बजाज कृषी महाविदयालय, पिपरी वर्धा येथील चौथ्या वर्षाच्या विध्यार्थीनी ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि औदयोगिक प्रशिक्षणा अंतर्गत भिवापूर येथे शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बीज अंकुरण क्षमता चाचणी हे करून दाखविले व त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.तसेच बीज प्रक्रियेचे महत्व व शंका पटवून दिले. तसेच यावेळी जायदे मॅडम कृषी सहाय्यक व श्री. पी. आर. राऊत ग्रामसेवक उपस्थित होते. हा कार्यक्रम बजाज कृषी महाविद्यालय पिपरी येथील प्राचार्य डॉ.बी के सोनटक्के, उपप्राचार्य देशमुख, कार्यक्रमाधिकारी रविद्र खर्चे, डॉ. रविराज, उदासी, डॉ. मंगेश घोडे डॉ. प्रियंका हिरोले यांच्या मार्गदर्शनाखली कृषीदुत साहिली मिसार, ईशिका कारेमोरे, मानसी मालापोलू,उर्वशी कोरपे, अंकिता गुरधे, ऋतुजा डोंगरे यांनी प्रात्याक्षिक करून दाखवले.