🔥बजाज जनरल इन्श्युरन्सचे व्यावसायिक वाहनांसाठी ‘इको ॲश्युअर’, किफायतशीर आणि विश्वसनीय दुरुस्ती कव्हरेजचा मार्ग
पणजी -/ मार्च 2026: – भारतातील अग्रगण्य खाजगी जनरल इन्श्युरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड (पूर्वीची बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड) कंपनीने आज व्यावसायिक वाहनांसाठी इको ॲश्युअर हे नवीन ॲड-ऑन कव्हर लाँच केल्याची घोषणा केली. हे नवीन कव्हर व्यावसायिक वाहन मालकांना दुरुस्तीचा खर्च अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या वाहनांची कमीत कमी व्यत्ययासह सतत कार्यरत राहण्याची खात्री करण्यासाठीही हे उपयुक्त ठरेल.
व्यावसायिक वाहने ही भारतभर मालवाहतूक, पुरवठा साखळी आणि व्यवसायिक गतिशीलता यांना समर्थन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि, दुरुस्तीचा वाढता खर्च, वाढते मेंटेनन्स अडचणी आणि व्यावसायिक वाहनांची असुरक्षितता यामुळे वाहनमालक आणि चालकांसाठी दुरुस्ती अनेकदा खर्चिक बाब ठरते. इको ॲश्युअर हे या अडचणींवर उपाय म्हणून विकसित करण्यात आले आहे. यामध्ये रिपेअरिंगचे अधिक व्यापक कव्हरेज, विश्वासार्ह दुरुस्ती पर्याय आणि अधिक संरक्षणात्मक फायदे प्रदान करण्यात आले आहेत
ॲड-ऑन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: इको ॲश्युअर इसेन्शल आणि इको ॲश्युअर ॲडव्हान्टेज हे कस्टमरला त्यांच्या गरजा पूर्ण करणारा प्लॅन निवडण्याची लवचिकता प्रदान करतात. इको रिपेअर कव्हरचे मुख्य फायदे म्हणजे दुरुस्ती करताना रिकंडिशन (पुन्हा दुरुस्त केलेले) पार्ट्स वापरल्यास डेप्रीसिएशन वर 100% सूट दिली जाते. ज्यामुळे दुरुस्तीचा खर्च कमी करण्यास मदत होते. नवीन पार्ट्स दुरुस्तीसाठी निवडलेल्या प्रकरणांमध्ये निवडलेल्या प्लॅननुसार ते 25% पर्यंत डेप्रीसिएशन सूट प्रदान करते.
इको ॲश्युअर – व्यावसायिक वाहनांसाठी क्लेमच्या वेळी अनिवार्य कपातयोग्य देखील दूर करते, ज्यामुळे कस्टमरला दुरुस्तीदरम्यान त्वरित खिशातून खर्च कमी करण्यास मदत होते. ॲड-ऑनमध्ये लॅम्प, बंपर, बोनेट आणि साईड पार्ट्स सारख्या सामान्यपणे नुकसानग्रस्त घटकांसाठी पेंटवर्क आणि इनबिल्ट संरक्षणासाठी 100% कव्हरेज समाविष्ट आहे, जे नियमित दुरुस्तीच्या परिस्थितीसाठी व्यापक कव्हरेज सुनिश्चित करते.
अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत व्यावसायिक वाहन मालकांना सपोर्ट करण्यासाठी, इको ॲश्युअर टोईंग लाभांसह ओव्हरटर्निंग कव्हर प्रदान करते.
इको ॲश्युअर इसेन्शल हे टोईंग सपोर्टसह इको रिपेअर कव्हर ऑफर करते. या प्लॅन मध्ये उपभोग्य खर्चासाठी अंतर्भूत कव्हरेज, कुलूप व चावी बदलण्याची सुविधा तसेच उंदरांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण उपलब्ध आहे.
इको ॲश्युअर ॲडव्हांटेज मध्ये या लाभांचा विस्तार करत अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक सुविधा दिल्या आहेत. हा प्लॅन दुर्गम किंवा अवघड ठिकाणी अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी सहाय्य उपलब्ध करून देतो. यासोबतच इलेक्ट्रिक व हायब्रिड प्रणालींसाठी स्वतंत्र कव्हरेज देऊन संरक्षणाचा विस्तार करतो. ज्यामुळे पारंपरिक तसेच इलेक्ट्रिक/हायब्रिड वाहनांशी संबंधित जोखमींपासून मालकांचे संरक्षण होते.
याशिवाय, या योजनेत डिफेन्स कॉस्ट कव्हरचा समावेश असून आवश्यकतेनुसार कायदेशीर खर्चासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे, या ॲड-ऑन मधील सर्व लाभ कोणत्याही वर्कशॉपमध्ये केलेल्या दुरुस्तीसाठी लागू आहेत. ज्यामुळे पॉलिसीधारकांना अधिक लवचिकता आणि सुलभता मिळते.