बाप समजून घेताना,न समजलेले आई-बाप..! डॉ वसंत हंकारे व दिव्या भोसलेंचे हृदयस्पर्शी व्याख्यान….
🔥व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम.
वर्धा -/ सुप्रसिद्ध व्याख्यानकार डॉ वसंत हंकारे आणि व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांच्या “बाप समजून घेताना, न समजलेले आई-बाप” या हृदयस्पर्शी व्याख्यानाचे आयोजन शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवार ता.८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले. वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया आणि यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया व यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आनंदी जीवन जगण्याचा अर्थ समजावून सांगणाऱ्या हृदयस्पर्शी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्यानकार डॉ वसंत हंकारे आणि व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.आजच्या काळातील भरकटत चाललेल्या तरुणाईला समाजोपयोगी संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह पालकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे.
रज्जू जळगावकर साहसिक NEWS-/24 वर्धा