🔥माहूरच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करा.
श्री क्षेत्र माहूर -/ तालुक्यातील अति दुर्गम जंगलात असलेल्या मौजे चोरड येथील चार ते पाच शेतकऱ्यांच्या शेतात बांधलेल्या जनावरावर वाघ आणि बिबट्याने हल्ले करून मारून टाकल्याची घटना सन २०२२-२३ मध्ये घडल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून वन विभागाकडे निवेदन दिले होते.
सदरील नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाली असताना परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी ती रक्कम परस्पर उचलून आपहार केल्याने शेतकऱ्यांनी त्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करत नुकसान भरपाई देण्याची मागणी बंडू नारायण राठोड आणि निरंजन नृसिंह राठोड रा चोरड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
माहूर तालुक्यातील चोरड,भोरड, जुनापाणी सह जंगल दर्या खोऱ्यात वसलेल्या गावांमध्ये सन २०२२ पासून वाघ,बिबट्याने धुमाकूळ घालून शेकडो जनावरांना फस्त करत रोही, निळगाय सह इतर जनावरांनी शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान केल्याच्या ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या. शासनाकडून या सर्व शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते परंतु अनुदान वाटप करण्यासाठी शासकीय रक्कम वन विभागाच्या अकाउंटला जमा होते ती रक्कम शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावून वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचारी वाटप करतात. वाटप करताना ज्या शेतकऱ्याला रक्कम दिली त्याची व्हाउचर वर सही घेऊन रक्कम देण्यात येते अशी इतिहासकालीन पद्धत आजही वन विभागाकडे कायम ठेवण्यात आल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यांना नामी शकल लढवून खोट्या सह्या व अंगठे व्हाऊचर वर मारत एक कोटी पेक्षा जास्त रक्कम उचलून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. सदरील बाब माहीत झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या परंतु याची दखल कुठेही होत नसल्याने शेतकऱ्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
मौजे चोरड येथील शेतकरी बंडू नारायण राठोड आणि निरंजन नृसिंह राठोड यांनी दि. ९ रोजी वन विभाग माहूर सह वन मंत्र्याकडे लेखी ऑनलाईन तक्रार करून येथे आठ दिवसात मंजूर झालेली रक्कम मला न दिल्यास मी अमर आमरण उपोषणास बसेल असा इशारा निवेदनात दिला असून कोट्यावधीची रक्कम हडप केल्याच्या ठपका ठेवत एका तात्पुरती नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांची वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी हकालपट्टी केली असून रक्कम न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिल्याने वरिष्ठ अधिकारी सदरील प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे लक्ष लागून आहे.
ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज -/24 श्री क्षेत्र माहूर