बिडकीन बनलाय फ्लेक्स बॅनरचा माहेरघर…..

0

बिडकीन -/ बिडकीन रोड वरती पैठण औरंगाबाद हायवे रोड लगत लागलेले बॅनर वर कोणी काही दखल घेत नाही .असे प्रश्न जनतेला पडले यास पोलीस व ग्रामपंचायत का दखल घेत नाही विद्यार्थी व ऑटोरिक्षा काळी पिवळी जनतेस त्रास होत आहे. भाऊ ,दादा, नावाचे छोटे मोठे बॅनर लावून विद्रूपीकरण झाले आहे, याकडे कोणतेही शासकीय अधिकारी ग्रामपंचायत याकडे लक्ष द्या देत नाही, व छोटे मोठे व्यापारी यांना खूप त्रास होत आहे यास कोणीही दखल का घेत नाही असे प्रश्न व्यापारी व जनतेला पडले फ्लेक्स बोर्ड लावण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी घेऊन लावले जातात हे फ्लेक्स बोर्ड किती दिवसासाठी लावले आहे.याची परवानगी घेत असतात बिडकीन रोड वरती पैठण औरंगाबाद हायवे रोड लगत बोर्ड लावण्यात आलेले आहे .या सर्व फ्लेक्स बोर्ड ग्रामपंचायत ने परवानगी दिलेली आहे की नाही हे पाहणे महत्वाचे आहे.त्यात पाइपलाइनच्या कामा मुळे व चिखल झाल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यात रस्त्या लगत बैनर लावले आहेत.रहदारी करणाऱ्यांना खुप अडचन होत आहे. मागच्या वेळेत पोलिस स्टेशन मध्ये बैठक घेण्यात आली होती. ग्रामपंचायत,नागरीक उपस्थित होते. त्यात बैनर बद्दल नियम सांगण्यात आले होते. त्या नियमांचा काय झाल? ह्या बैठाका फक्त देखाव्याला असतात काय असा प्रश्न जनतेला पडला आहे. जर ह्या बैठका देखाव्याला असतात तर आम्ही असा बैठकला जाणार नाही अशी जनतेत चर्चा आहे.

अर्षद शेख साहसिक news -/ 24 बिडकीन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!