बिडकीन -/काही दिवसापासून बिडकीन शहरांमध्ये मोकाट कुत्रे तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा वावर वाढत चालला आहे.यामुळे महिला पुरुष वयोवृद्ध माणसे लहान मुले यांना रस्त्यावर जीव मुठीत धरून जावे लागत आहे. हे मोकाट कुत्रे दिवस-रात्र गावात गल्ल्यात रस्त्यावर फिरत आहे व अनेक जणांना चावा घेत आहेत. याकडे संबधीत स्थानिक प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे व या मोकाट कुत्रे व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा निलजगाव रोड भारतनगर,बागवान गल्ली,सोनावने गल्ली, स.भू विद्यालय परिसर, रांजणगाव रोड परिसर, बसस्थानक परिसर, या ठिकाणी मोकाट कुत्रे दिवस-रात्र हैदोस घालत आहे.विशेष म्हणजे या ग्रामीण भागात छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद येथील नगरपालिका शहरातले मोकाट कुत्रे ग्रामीण भागत आणून सोडतात यामुळे हा कुत्रे ग्रामीण भागातील लोकांना संतप्त विषय बनला आहे तरी याकडे संबंधित अधिकारी यांनी दाखल घेऊन या ग्रामीण भागातील , मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा नसता भिम गर्जना सामाजिक संघटना तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.