बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ,घातपाताची शंका..!

0

वर्धा,झडशी -/ सहवन क्षेत्रातील मौजा चारगांव शिवारात आज सकाळच्या सुमारास मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी घातपाताची शंका व्यक्त होत असून वनविभागाचे अधिकारी अलर्ट मोडवर आल्याचं सांगितलं जाते.
झडशी सहवन क्षेत्रातील मौजा चारगांव शिवारात आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची माहिती वनविभागाला मिळाली. मौजा चारगांव शिवारातील लोहकरे शेतकऱ्याच्या शेताजवळील पडतात सदर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. यासंदर्भात माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मादी बिबट्या मृतावस्थेत पडून होता. सदर घटनास्थळी वनविभागाचे आरएफओ खेडकर,अमरजी पवार, झडशी सहवनाचे क्षेत्र सहाय्यक जी जी टाक, वनरक्षक ए एस मौजान, एस एच भोईटे, ए एम ढाले, जी एस महागडे, बिटरक्षक एम एम कुकडे यांनी भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का चौकशी पंचनामा केला. दरम्यान मादी बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला किंवा घातपात घडवून आणला यासंदर्भातील माहिती शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
सदर बिबट्याचा मृत्यू घटनास्थळीच झाला अथवा त्याला कोणीतरी त्याठिकाणी आणून टाकले यासंदर्भात परिसरातील गावामध्ये सद्या कुजबुज सुरु असलेल्या सागितल जाते.

गजेंद्र डोंगरे साहसिक NEWS-/24 झडशी, वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!