बिहारी व्यवस्थापक ब्रिजेश यादव यांचे अनेक नातेवाईक कंपनीत करतात काम…

0

🔥 हीच ती महालक्ष्मी(S M W) इस्पात कंपनी 🔥

देवळी शहरातील तरुणांना कंपनीत नाही मिळत काम.

महिलेसोबत अश्लील चाळे करणारा ही ब्रिजेश यादव यांचाच नातेवाईक.

देवळी / शहरातील महालक्ष्मी टीएमटी इस्पात हल्लीची (S M W) इस्पात ही कंपनी कार्यरत आहे.परंतु या कंपनीमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणा वरून चर्चेत असते आता काही दिवसापूर्वी कंपनीतील सुरक्षा प्रमुख याने एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा गुन्हा देखील देवळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे.यामध्ये कंपनीचे नाव समोर आलेले आहे.त्यामुळे ज्या सुरक्षा प्रमुखाने ज्या कंपनीचे नाव बदनाम केले त्या सुरक्षा प्रमुखावर कंपनी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे.सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार हा सुरक्षा प्रमुख( S M W)इस्पात कंपनीचे व्यवस्थापक ब्रिजेश यादव यांचा नातेवाईक असल्यामुळे म्हणून त्याच्यावर कोणतीस कारवाई होत नाही आहे. उलट त्या महिलेवरच दोषारोपण होत आहे.तसेच मिळालेल्या माहितीनुसार(S M W) इस्पात कंपनीचा रोलिंग मिल विभागात सुद्धा कंपनी व्यवस्थापक ब्रिजेश यादव यांचे अनेक परप्रांतीय बिहारी नातेवाईक ज्यांची लायकी नसून सुद्धा ते कंपनीत काम करीत आहे.त्यामुळे देवळी शहरातील तरुण बेरोजगारांना या (S M W) इस्पात कंपनीत काम मिळत नाही त्यामुळे बेरोजगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरलेले आहे.तसेच या(S M W) इस्पात कंपनीमध्ये कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या जवळचे अनेक परप्रांतीय नातेवाईक आणून या कंपनीमध्ये कामावर लावलेले आहे.या कंपनीसाठी देवळीकर नागरिकांनी आपल्या हक्काच्या जमिनी दिल्या, कंपनींना लागणारा सर्व सुविधा या देवळी शहरातून पूरविल्या जातात, आणि (S M W)इस्पात कंपनीत रोजगार मात्र येथील मोठे अधिकारी आपल्या परप्रांतीय नातेवाईकाला बोलावून या कंपनीत काम देतात.आणि या कंपनीला देवळीवासीयांनी सर्व काही दिले त्याच गावातील तरुणांना तेथे अपमानास्पद वागणूक देऊन काम मिळत नाही की हे कितपत योग्य आहे? आता या कंपनी विषयी देवळी शहरांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरत आहे या कंपनीने देवळी तालुक्यातील काही मैने खाऊ नेते हाताशी धरून ते देवळीकर बेरोजगारांना डोळे दाखवत आहे.कंपनीत महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या सुरक्षा प्रमुखाची हकलपट्टी केली नाही तर(S M W)इस्पात कंपनी समोर आंदोलन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच देवळीकर बेरोजगारांना या कंपनीत काम मिळावा व कंपनीत अधिकाऱ्यांनी आणलेल्या परप्रांतीय नातेवाईकांना कंपनीतून कमी करून तेथे देवळीतील बेरोजगार तरुणांना संधी देण्यात यावी अशी मागणी देवळीकर जनता करीत आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज /24 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!