आष्टी (शहीद) -/येथुन नजीकच असलेल्या बाटोना येथे रासी सीड्स च्या वतीने पीक परिसंवाद संपन्न झाला.या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून रासी सिडस् चे विभागीय व्यवस्थापक श्री. उमेश भगत,टेरिटेरी मॅनेजर.तुषार धोटे, समीर चवरे व प्रतिनिधी,नंदकिशोर हराळे,अरविंद शिंदे ,विनोद खातरकर, व श्रीराम ऍग्रो सेंटर कारंजा (घाडगे)चे व्यवस्थापक भुषण धांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमात परीसरातील शेकडो प्रगतशिल शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. या कार्यक्रमा मध्ये कापूस पिकाचे नियोजन तसेच विक्री पश्चात सेवा तसेच जमीनीच्या मगदुराप्रमाणे वाणांची निवड या बद्दल मार्गदर्शन रासी सीड्स चे विभागीय व्यवस्थापक उमेश भगत यांनी केले तसेच कापूस पिकावरील रोग व किडीच्या नियोजनाबद्दल संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली आणि काही शेतकऱ्यांची प्रश्नांची उत्तरे देण्यात आली कार्यक्रमाला परीसरातील प्रगतीशील सर्व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.