बोरखेडी गावाला अनेक समस्याचे ग्रहन ” मात्र,ग्रामस्थांनी समस्यांचा वाचला पाढा…

0

बोरखेडी गावातील नागरिक अनेक मूलभूत सुविधापासून वंचीत.

 वर्धा -/ आष्टी तालुक्यातील जंगल भागाने वेढलेले बोरखेडी हे गाव बांबरडा  गट ग्रामपंचायत अंतर्गत येते. गावाची एकूण लोकसंख्या ही ७०० एवढी आहे.आजही बोरखेडी हे गाव विकासापासून कोसो दूर आहे.कारण या गावाला अनेक समस्याने ग्रासले असून कुठल्याही सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने आज हे बोरखेडी गाव सर्व स्तरावरून दुर्लक्षित आहे.आज या गावाच्या ग्रामपंचायतिचा कारभार प्रशासकाकडे आहे.परंतु कित्येकदा ग्रामसेवक यांना संपर्क करून सुद्धा योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे ग्रामस्थां कडून बोलल्या जात आहे. गावातील समस्यांचे निराकरणकधी होत नाही.उन्हाळ्यात आमच्या भागात पाणी नसताना आम्हाला पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते. परंतु आजही आमच्या गावात भरपूर पाणी असताना विहिरी, नदी भरून असताना सुद्धा आजही गावातील स्त्री पुरुषांना डोक्याने बाहेरच्या विहिरीवरून पाणी भरावे लागते. महिलांना शेतीचे कामे असताना सुद्धा पिण्याचे पाणी डोक्याने भरावे लागते. गावात कित्येक महिन्यापासून गावात अंधार असून अजूनही बऱ्याच पोल वर लाईट लागलेले नाही. रात्रीच्या वेळेत लहान मुले,नागरिकांना फिरताना सुद्धा भीती वाटते.आजही गावात नाल्यांची सफाई होत नाही. मच्छर, डासांचे प्रमाण वाढलेले आहे. साथीच्या रोगाने ग्रासले आहे.अनेकांचे आरोग्य धोक्यात असून गावात सिमेंट रोड पूर्ण उखडलेले आहे. गावातील रस्ते चालण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचा रस्ता सुद्धा शेवटच्या घटका मोजत आहेत. अनेक स्त्रिया पाणी आणता आणता पडल्या सुद्धा आहे.नळाची पाईप लाईन बऱ्याच ठिकाणी फुटलेली आहे. त्यामध्ये गावातील नाल्यांचे, उकिरड्याचे घाणेरडे पाणी मिसळत असून तेच पाणी नळाद्वारे लोकांच्या घरी येत आहे. गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यायेण्यासाठी सुद्धा योग्य रस्ता नाही. दोन फूट चिखलातून आपल्या शेतीचे कामे करण्यासाठी ये जा करावे लागत आहे. आमच्या बोरखेडी – बांबरडा या गट ग्रामपंचायत या दोन गावातील अंतर हे फक्त दोन किमी आहे परंतु आम्हाला कार्यालयीन कामकाजाकरिता आजही 7 किमी फेऱ्याने जावे लागते. आमच्या गावातील प्राथमिक शाळेची अत्यत दयनीय अवस्था आहे.मुलांना बसण्याकरिता शाळेची सुसज्ज इमारत सुद्धा नाही.पावसाळ्यात पावसाचे पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर पडते.कसे विद्यार्थि शिक्षण घेतील हा मोठा प्रश्न आहे. म्हणून प्रशासनाला आमची गावकऱ्यांची विंनती आहे कि आमच्या गावातील ज्या समस्या आहे, त्या त्वरित सोडवाव्या आणि नागरिकांना मूलभूत सुविधांची पूर्तता करावी.  🔥”बोरखेडी येथे अनेक समस्या आहे .या कडे ग्रामपंचायत तसेच प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा सुद्धा प्राप्त होत नाही. सुविधेअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. भरपूर पाणी असताना सुद्धा ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना आजही डोक्याने पाणी भरावे लागत आहे .आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा आम्हा गावकऱ्यांना सुविधा का मिळत नाही. अधिकारी वर्ग सुद्धा आमच्या मागणी कडे लक्ष देत नाही .येणाऱ्या काही दिवसात जर आमच्या सोडविल्या गेल्या नाही तर आम्ही गावातील नागरिकांसह आमच्या समस्या सुटाव्या या साठी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.(डॉ.तुषार नायकुजी बोरखेडी)

गजेंद्र डोंगरे साहसिक news-24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!