🔥बोरखेडी येथील पाट बंधारा दुरुस्ती बांधकाम राम भरोसे,कंत्राटदार मात्र बेपत्ता.
🔥पहिल्याच पुरात बांधारा वाहून जाण्याची दाट शक्यता.
आष्टी शहीद -/ आष्टी तालुक्यातील पाणी टंचाई चे गाव म्हणून बोरखेडी गावाची ओळख आहे. याच गावाच्या जांब नदीवर जल संधरण विभागाचा पाट बंधारा दुरुस्ती बांधकाम करण्यासाठी कंत्राट दाराने अनोखी शक्कल लढवून निर्माण असलेल्या भिंतीवर स्लॅप टाकून झटपट काम करण्याचा सपाटा सुरु आहे.बांधकाम करताना त्यावर पाणी वेळेवर टाकणे गरजेचे असताना बेपताकंत्राट दार झाला आहे.
सविस्तर असे कि,
बोरखेडी व बामरडा तसेंच थार गावाच्या शेजारी वाहणारी जांब नदी उन्हाळ्यात पाणी टंचाई वर मात करते. या जांब नदीवर असलेला पाट बंधारा अर्धवट फोडून त्यावर काँक्रेट टाकून निस्कृष्ट दर्जाचा करण्यात आला. जांब नदीवर पाणी अडवून तेथील पाणी ओळीताठी वापरण्यात येते. जुन्याच कामावर स्लॅप टाकून कसे बसे बांधकाम करण्यात येते आहे. काम बोगस होत आहे यासाठी गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी श्री. विनीत साबळे यांना फोनवरून माहिती दिली. साबळे यांनी काम चांगले होत आहे अशी कबुली दिली. मात्र प्रत्यक्षात गावकर्यांच्या म्हणण्यानुसार झालेले पूर्ण काम बोगस आहे. या बांधकामची चौकशी करून कंत्राट दारावर कार्यवाही व्हावी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, उपविभागीय अधिकारी जल संधरण लघु पाट बांधधारे विभाग यांना तक्रारी देण्यात आल्या. चौकशी करून कार्यवाही व्हावी अशी मागणी आहे. तशीच उपविभागीय बांधकाम अधिकारी साबळे यांच्या कार्यक्षेत्रात होत असलेले कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार असून सर्व कामे संशयित आहे सुरू असलेल्या कामात साबळे हे ठेकेदाराचें पार्टनर आहे का ?अशी दिसते बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी कोणताही मजूर पाणी टाकण्यासाठी दिसून येत नाही. म्हणून हा बंधारा पहिल्याच पुरात वाहून जाईल अशी शंका गावाकऱ्यांना आहे. येथील बांधकाम राम भरोसे आहे अशी गावाकऱ्यांची ओरड आहे.(क्रमशः)