ब्रेकिंग न्यूज,अखेर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील बहुचर्चेतील औषधी घोटाळ्याचा संबंधात औषधी निर्माण अधिकारी महेश प्रभाकर देशमुख निलंबित……

0

🔥अखेर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील बहुचर्चेतील औषधी घोटाळ्याचा संबंधात औषधी निर्माण अधिकारी हाच तो महेश प्रभाकर देशमुख निलंबित.

गडचिरोली -/ जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे २०१९ पासून औषधी खरेदी घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याच्या अनेक तक्रारी असलेल्या औषधी निर्माण अधिकारी  महेश प्रभाकर देशमुख यांच्यावर आर्थिक अनियमताचा ठपका ठेवत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांनी आज १६ जुलै रोजी निलंबनाचे आदेश धडकले.
त्यांच्या बाबतच्या तक्रारी पालकमंत्री,सहपालकमंत्री यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी त्या तक्रारीची चौकशी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत करण्यात यावी असे आदेशित केल्यानंतर जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी चौकशी समिती गठित करून त्या चौकशी अहवालात आर्थिक अनियमयता झाल्याची शक्यता वर्तवून त्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत उपसंचालक आरोग्य सेवा यांना कळविले त्यानुसार सहसंचालक, अर्थ व भांडार, आरोग्य सेवा मुंबई यांनी तपासणी केल्यानंतर सुद्धा त्यामध्ये आर्थिक अनियमितता आढळून आल्याने त्यांनी नियुक्त प्राधिकारक उपसंचालक यांना निलंबन करण्याचे आदेश दिले.

गजानन ढाकुळकर साहसिक News-/24 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!