भरधाव वेगाने धावणाऱ्या आयसरने दिली उभ्या ट्रकच्या धडकेत एक मृत्यू तर एक गंभीर जखमी……

0

🔥भरधाव वेगाने धावणाऱ्या आयसरने दिली उभ्या ट्रकच्या धडकेत,एक गंभीर तर दुसऱ्याचा मृत्यू.

हिंगणघाट -/ नादुरुस्त वाहनाला भरघाव धावणाऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने सुलतानसिंग बामेल(६०) या वाहनचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा वाहनचालक गंभीर जखमी होऊन त्याचे दोन्ही पायाला मोठी दुखापत झाल्याची घटना आज दुपारी १.१५ सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव उड्डाणपूलावर घडली.
मध्य प्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यातील डवरा येथील वाहन चालक शैलेंद्र चव्हाण तसेच क्लीनर गगन बाथम हे आपल्या ट्रक क्र. एम. पी.०७/एच बी ५८२७ या वाहनाने आंध्र प्रदेशातून ग्वाल्हेर येथे जाण्यास निघाले असता त्यांचे वाहन स्थानिक शिवाजी मार्केट यार्ड नजीकच्या नांदगाव उड्डाणपुलावर नादुरुस्त झाले.
वाहनचालक शैलेंद्र चव्हाण तसेच त्याचा क्लीनर हे ट्रकची वाहन दुरुस्ती करत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्र एम.पी.०७/जी.ए.९८६६ ने जोरदार धडक दिली.
या दुर्देवी घटनेत दुरुस्तीकरीता उभ्या असलेल्या ट्रकचा वाहन चालक गंभीर जखमी होऊन दोन्ही पायाला मोठी दुखापत झाली तर धडक देणाऱ्या वाहनाचा वाहनचालकाचा ट्रकमध्येच घटनास्थळी मृत्यू झाला.
हा वाहनचालकसुद्धा आंध्र प्रदेशातून माल घेऊन ग्वाल्हेर येथे जाण्याकरीता निघाला होता.
हिंगणघाट पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले, नादुरुस्त वाहनाचे वाहनचालक शैलेंद्र चव्हाण याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले.
घटनास्थळीच निधन झालेला वाहनचालक सुलतानसिंग बामेल याचा मृतदेहसुद्धा शवविच्छेदनाकरीता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

ईकबाल पहेलवान साहसिक News-24 हिंघणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!