देवळी -/भारत देश हा तरुणांचा देश असून तरुणांना डिजिटल नेटिव्ह असेही म्हटल्या जाते. ‘ क्लिक टू प्रोग्रेस ‘ तसेच ‘युथ डिजिटल पाथवेज फॉर सस्टेनेबल मुव्हमेंट ‘ या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय दिवस 2024 ची थीम होती. शाश्वत विकासात तरुणांचे योगदान आवश्यक आहे . भविष्य त्याच्याच मालकीचे असू शकते जो स्वप्नावर विश्वास ठेवतो . आशादायी असतो. असे विचार अध्यक्षस्थानावरून कार्यकारी प्राचार्य डॉ. अरविंद पाटील यांनी प्रतिपादन त्यांनी केले . ते आंतरराष्ट्रीय युवा दिवसा निमित्य बोलत होते.स्थानिक अनिकेत कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा येथे राष्ट्रीय सेवा योजना , रेड रिबन क्लब , सांस्कृतिक विभाग, जिल्हा विधी प्राधिकरण , सामान्य रुग्णालय व समाज कार्य पंधरवडा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ . अरविंद पाटील, प्रमुख मार्गदर्शक विधी सेवा प्राधिकरण न्यायमूर्ती श्री . विवेक देशमुख, डॉ . नम्रता सलुजा वैद्यकीय अधिकारी , सामान्य रुग्णालय वर्धा, नूरुल हक शेख जिल्हा कार्यक्रम अधिकारी सामान्य रुग्णालय वर्धा , रेड रिबन क्लबचे समन्वयक डॉ . दीपक उईके आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. विवेक देशमुख म्हणाले की, ‘ माणूस समूहाने राहत असतो. म्हणूनच गावातील प्रत्येकामध्ये जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं पाहिजे. आता शुल्लक कारणावरून भांडणाला तोंड फुटत असून गावातलं भांडण गावातच मिटविला पाहिजे. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे प्रतिपादन मा. विवेक देशमुख , वरिष्ठ जिल्हा दिवाणी न्यायाधीश वर्धा , यांनी केले . ते आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थी संवाद साधत होते .यानंतर समाजकार्य पंधरवड्या निमित्ताने ‘ इतरांचा आदर – महिलांचा सन्मान ‘ तसेच ‘शिव्या मुक्त समाज अभियान ‘ अंतर्गत शपथ घेण्यात आली यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रवींद्र सहारे तर रेड रिबन क्लबचे समन्वयक डॉ. दीपक उइके यांनी प्रास्ताविक केले . तर आभार डॉ . प्रशांत शंभरकर यांनी मानले .