🔥भाजपाचे दिनकरराव पावडे पाटील यांचे एसडीओ वणी यांना निवेदन!..
वणी -/राज्यामध्ये कुठेही रेतीचा लिलाव न झाल्यामुळे लोकांना रेती मिळत नाही. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकासह पात्र घरकुल धारकांनाही रेती मिळत नाही. त्यामुळे जनतेचे हाल होत आहे ही बाब हेरून भाजपा किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष दिनकरराव पावडे पाटील यांनी नुकतेच आपल्या लेटर पॅडवर उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन सादर केले. सदर निवेदन हे एसडीओ वणी यांचे वतीने नायब तहसीलदार विजय मते यांनी स्वीकारले. सदर निवेदनामध्ये दिनकरराव पावडे यांनी चार मुद्द्यावरील समस्या मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने 1) घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास विनामूल्य रेती देणे. 2,) बीडिओ वणी यांच्याकडून विविध योजने अंतर्गत असलेल्या पात्र घरकुल लाभार्थ्याची यादी घेणे. 3) ग्राम पंचायत क्षेत्रातील घरकुलांचे बांधकाम आराखडा प्रमाणे रेतीचा पुरवठा करणे. 4,)
गावातील स्थानिक नागरिक यानी जर घर बांधकामासाठी रेतीची मागणी केल्यास त्यांना शासकीय दर 600 रुपये ब्रास प्रमाणे स्वामित्व धनतत्त्वावर रेती अथवा वाळूचा पुरवठा करणे. त्याशिवाय सदर निवेदनामध्ये श्री पावडे यांनी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत राज्याला 20 लक्ष घरकुलाचे उद्दिष्ट दिलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याला 20 लक्ष घरकुलाचे उद्दिष्ट दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात योग्य विकासाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे महायुती सरकारने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत गरिब जनतेस 20 लाख घरकुल विकासाचे उद्दिष्ट शिवधनुष्य पेलण्याचे धाडसही स्वीकारले असल्याचे नमूद केले आहे. पुढे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंत्योदय गटातील व्यक्तींना प्रमाण मानून सर्वसामान्य गरीब माणसाच्या जीवनात बदल घडविण्याकरिता अनेक धाडसी निर्णय घेतलेले आहेत. त्यापैकी वाळू रेती धोरणाबाबत नुकताच आलेला 30 एप्रिल 2025 चा शासन निर्णय असल्याचे नमूद केले. याबाबत स्थानिक तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सदर शासन निर्णयाप्रमाणे घरकुल धारकांना रेती मिळेल याकरता आदेश निर्गमित करावे की जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना घर बांधणी साठी रेती उपलब्ध होईल अशी विनंती केली आहे.