भाजपा जनता युवा मोर्चा च्या वतीने नवाब मलिक यांच्या विरोधात मोर्चा
प्रतिनिधी / वर्धा :
देवेंद्र फडणवीस यांच्या वर नवाब मालिकांनी एका आतंकवाद्या कडून जमीन विकत घेतल्याचे आरोप केला होता. नवाब मलिक यांचे संबंध आतंवाद्यांसोबत आहे. अश्या देशद्रोही ला पदावरून हटविण्याची मागणी यावेळी भाजपा तर्फे करण्यात आली याच निषेधार्थ आज वर्धेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा जनता युवा मोर्चा यांच्या वतीने नवाब मलिक यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला यावेळी युवा मोर्चा चे वरून पाठक अविनाश देव व इतर भाजपा कार्यकर्ता या वेळी उपस्थित होते.