भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद…..

0

🔥विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे केले आवाहन.

हिंगणघाट -/ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक निखाडे सभागृहात आयोजित संवाद बैठकीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर आमदार समीर कुणावार, विदर्भ प्रदेश मंत्री सुधीर दिवे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाड, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, भूपेंद्र शाहने ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थित होती. विशेष म्हणजे आमदार बावनकुळे यांनी भाषण न देता कार्यकर्त्यांची थेट संवाद साधून त्यांच्यात उत्साह निर्माण केला. यावेळी बोलताना त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणीमीमांसा करून येत्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी नवीन रणनीती आखून कशाप्रकारे विजय साध्य करता येईल? याचा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले की गत लोकसभा निवडणुकीत केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यास आपण कुठेतरी कमी पडलो. तसेच महाविकास आघाडीच्या नारेटिव प्रचारामुळे लोकसभेत अनेक ठिकाणी आपल्याला पराभव पत्करावा लागला. परंतु आता ती परिस्थिती राहिली नसून जनतेला वस्तुस्थिती कळली आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या विविध योजना प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. राज्य शासनाने विविध योजना सर्वसामान्य जनतेच्या हिताकरिता सुरू केले आहे. परंतु प्रत्यक्षात त्या जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने चा लाभ संबंधित लाभार्थींना मिळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. या योजनेचा मोठा फायदा तळागाळातील गरीब वर्गातील महिलांना झाला आहे. तसेच शासनाच्या वतीने महिलांकरीता बस मध्ये अर्धे तिकीट प्रवास , वयोश्री योजना , तीर्थयात्रा योजना यासारख्या जनसामान्यांना उपयुक्त असणाऱ्या योजना शासनाने सुरू केल्या असून त्याचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांकरीता महा विकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात कोणत्या योजना राबविण्यात आल्या नाही. उलट गत अडीच वर्षात महायुतीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोदी शासनाने तसेच राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये राज्य व केंद्र शासनाचे मिळून बारा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. पाच वर्षाची वीजमाफी सुद्धा शासनाने केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मूल्य मिळायला पाहिजे याकरिता केंद्र शासनाने आपल्या आयात निर्यात धोरणात मोठ्या प्रमाणात बदल केला आहे. त्यामुळे येत्या काळात शेतमालाला चांगला व योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाने मुलींकरीता शैक्षणिक शुल्क माफ केल्याने याचा मोठ्या प्रमाणात फायदा गरीब कुटुंबातील मुलींना होणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ज्या मुली शिक्षण घेऊ शकत नव्हत्या, त्या आता उच्च शिक्षण घेऊ शकणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध जनहितकारी योजना आता तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून राज्यात एकदा महायुतीचे सरकार स्थापन करण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे असे सरते शेवटी ते म्हणाले. उपस्थितांचे आभार मानताना आमदार समीर कुणावार म्हणाले की गत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला. त्यांचे मनात नरेटीव पसरविला. परंतु आता अशा भूलथापांना जनता बळी पडणार नाही. उलट ओबीसी, एससी, एसटी यांचे आरक्षण संपवण्याची भाषा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. त्यामुळे बहुजन वर्गाने राहुल गांधीच्या या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असून येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आपली जागा मतदारांनी दाखवून देण्याची गरज असल्याचे सांगून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वांना कामाला लागण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुनील गफाड यांनी केले. तर संचालन आकाश पोहाने यांनी केले. कार्यक्रमाला हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, बुथ प्रमुख , व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

ईकबाल पहेलवान साहसिक news -24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!